AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhaum Pradosh Vrat 2021 | भौम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी

प्रदोष व्रत हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण मानला जातो (Bhaum Pradosh Vrat 2021). प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला पाळला जातो. यावेळी प्रदोष व्रत मंगळवारी येत आहे. म्हणून त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिव यांच्यासह हनुमानजींची पूजा केल्याचे फळही मिळते

Bhaum Pradosh Vrat 2021 | भौम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी
Lord Shiva
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 8:12 AM
Share

मुंबई : प्रदोष व्रत हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण मानला जातो (Bhaum Pradosh Vrat 2021). प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला पाळला जातो. यावेळी प्रदोष व्रत मंगळवारी येत आहे. म्हणून त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिव यांच्यासह हनुमानजींची पूजा केल्याचे फळही मिळते (Bhaum Pradosh Vrat 2021 Know The Tithi Puja Muhurat And Importance Of This Auspicious Day).

यावेळी भौम प्रदोष व्रत 22 जून 2021 रोजी म्हणजेच आज आहे. हनुमानजींना भगवान शिव यांचा 11 वा अवतार मानला जातो, म्हणून प्रदोष व्रत केल्याने हनुमानजी देखील प्रसन्न होतात. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाशी संबंधित दोष असतील तर ते देखील संपतात. भौम प्रदोष व्रतांशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊया –

भौम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त

ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तारीख 22 जून 2021 रोजी आहे. ज्येष्ठ महिन्यातील त्रयोदशी तिथी सकाळी 10.22 ते 23 जून रोजी सकाळी 06.23 पर्यंत असेल. 22 जून रोजी भौम प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 07.22 ते रात्री 09.23 पर्यंत असेल. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी सिद्धी आणि साध्य योग आहे. या काळात शुभ कार्य करणे चांगले आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासह, एखाद्याला रोग आणि दोषांपासून मुक्तता मिळते.

भौम प्रदोष व्रत पूजेची पद्धत

❇️ सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प घ्या

❇️ यानंतर पूजा स्थळ स्वच्छ करुन तिथे गंगाजलने शिंपडा

❇️ भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र, धतुरा, भांग, जल इत्यादी अर्पण करा

❇️ प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी अनुष्ठान करुन पूजा करावी आणि दुसर्‍या दिवशी चतुर्थी तिथीला व्रत सोडावा

❇️ या दिवशी स्नान केल्यानंतर दान केले पाहिजे

भौम प्रदोष व्रताचे महत्त्व

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. याशिवाय संतान प्राप्तीचे सुख मिळते. प्रदोष व्रताच्या दिवशी उपासना केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रदोष व्रताच्या दिवशी फलाहार करावे.

Bhaum Pradosh Vrat 2021 Know The Tithi Puja Muhurat And Importance Of This Auspicious Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Nirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील

Ganga Dussehra 2021 | गंगा दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, भाग्योदय होईल, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.