Nirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील

हिंदू धर्मात एकादशी व्रत फार महत्वाचे मानले जाते (Nirjala Ekadashi 2021). या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला येते. आज निर्जला एकादशी (21 जून 2021) आहे. याला भीमसेन, पांडव आणि भीम एकादशी म्हणून ओळखले जाते.

Nirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील
lord vishnu
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jun 21, 2021 | 12:13 PM

मुंबई : हिंदू धर्मात एकादशी व्रत फार महत्वाचे मानले जाते (Nirjala Ekadashi 2021). या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला येते. आज निर्जला एकादशी (21 जून 2021) आहे. याला भीमसेन, पांडव आणि भीम एकादशी म्हणून ओळखले जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही (Nirjala Ekadashi 2021 Donate These Things On This Auspisious Day).

निर्जला एकादशीचा उपवास अत्यंत कठीण मानला जाते. कारण, या दिवशी उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीला फक्त पाण्यावर दिवस काढावा लागते. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडावा लागतो. या दिवशी विशेष उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय, या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे जाणून घ्या –

शीतलता देणाऱ्या गोष्टी दान करा

निर्जला एकादशीला पाण्याचे महत्त्व सांगणारी एकादशी मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या भीषण उष्णतेत शीतलता आणणार्‍या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की या महिन्यात उष्णता शिगेला पोहोचली आहे, म्हणून शीतलता आणणार्‍या गोष्टी या दिवशी दान कराव्यात. निर्जला एकादशीच्या दिवशी बरेच लोक सरबत दान करतात.

जोडे दान करा

शास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जोडे दान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय, अन्न दान करणे, छत्री दान करणे, अंथरुण दान करणे, कपडे दान केल्याने विशेष फळ मिळते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हरभरा आणि गूळ देखील दान करु शकता.

तुळशी पूजेचे फायदे

एकादशीला तुळशीची पूजा करावी. या दिवशी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूचे स्मरण करावे. असे केल्याने घरात संपत्ती, कीर्ति आणि वैभव कायम राहते. याखेरीज नोकरी आणि व्यवसायातही फायदा होईल.

Nirjala Ekadashi 2021 Donate These Things On This Auspisious Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganga Dussehra 2021 | गंगा दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, भाग्योदय होईल, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…

Mahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें