Mahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

हिंदू दिनदर्शिकेनुसार महेश नवमी (Mahesh Navami 2021) प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. आज महेश नवमी आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार महेश्वरी समाजाची उत्पत्ती भगवान शिवचा वरदानामुळे झाली होती. म्हणून महेश नवमी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते.

Mahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व
Mahadev
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 8:16 AM

मुंबई : हिंदू दिनदर्शिकेनुसार महेश नवमी (Mahesh Navami 2021) प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. आज महेश नवमी आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार महेश्वरी समाजाची उत्पत्ती भगवान शिवचा वरदानामुळे झाली होती. म्हणून महेश नवमी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. महेश्वरी समाजातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महेश नवमीशी संबंधित महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया (Mahesh Navami 2021 Know The Tithi Puja Muhurat And Pauranik Katha)-

महेश नवमी पूजा मुहूर्ता

नवमी तिथी प्रारंभ – 18 जून 2021 रात्री 08 वाजून 35 मिनिटांनी नवमी तिथी समाप्त – 19 जून 2021 सांकाळी 06 वाजून 45 मिनिटांपर्यंत

महेश नवमी पूजेची पद्धत

महेश नवमीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिव यांचा अभिषेक केला जातो. त्यांना गंगाजल, फुले, बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात. या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. महेश नवमीच्या दिवशी भगवान शिवचा डमरु वाजविला ​​जातो. या दिवशी देवी पार्वतीचीही पूजा केली जाते. विवाहित महिला श्रृंगारच्या वस्तू अर्पण करतात.

महत्त्व

महेश्वरी समाजातील लोकांसाठी महेश नवमीचा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी महेश्वरी समाजातील लोक शिवालयात आणि मंदिरात जातात आणि महादेवाची विशेष पूजा करतात. या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्ये आयोजित केली जातात.

पौराणिक कथा काय?

पौराणिक कथेनुसार महेश्वरी समाजाचे वंशज क्षत्रिय समाजाचे होते. एक दिवशी शिकार करताना ऋषींनी त्यांना शाप दिला. भगवान शिवने त्यांना या शापातून मुक्त करुन हिंसाचाराचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग सांगितला. महादेवाने या समाजाचे नाव महेश्वरी समाज ठेवले होते. भोलेनाथ यांचे म्हणणे ऐकून महेश्वरी समाजाच्या पूर्वज क्षत्रिय समाज सोडून वैश्य समाजात सामिल झाले. तेव्हापासून महेश्वरी समाज व्यापारी समाज म्हणून ओळखला जातो.

Mahesh Navami 2021 Know The Tithi Puja Muhurat And Pauranik Katha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा, जाणून घ्या नियम आणि फायदे

Mithun Sankranti 2021 : ‘मिथुन संक्रांती’, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व…

देवासमोर दिवा का लावला जातो? जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.