सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा, जाणून घ्या नियम आणि फायदे

सोमवारी भगवान शिव (Lord Shiva) यांची पूजा केली जाते. या दिवशी भाविक भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात. मान्यता आहे की, या दिवशी पूजा केल्यास भगवान शिव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.

सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा, जाणून घ्या नियम आणि फायदे
Lord Shiva

मुंबई : सोमवारी भगवान शिव (Lord Shiva) यांची पूजा केली जाते. या दिवशी भाविक भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात. मान्यता आहे की, या दिवशी पूजा केल्यास भगवान शिव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भगवान शंकराला बेलपत्र, धतुरा इत्यादी अर्पण करतात. या दिवशी रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप केला जातो. या मंत्राचा जप केल्यास सर्व त्रास दूर होतात (Chant Mahamrutunjaya Mantra To Please Lord Shiva Know The Rules And Benefits ).

ओम् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिवबन्धनान्मृत्योर्मुक्षीयमामृतात्।।

धार्मिक मान्यतेनुसार, ज्यांना भगवान शिव यांना संतुष्ट करायचे आहे त्यांनी या मंत्राचा जप करावा. असे म्हणतात की, या मंत्राचा जप केल्याने एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या धोक्या बाहेर काढता येते. तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर या मंत्राचा जप केल्यास तो निरोगी होतो. एवढेच नव्हे, तर या मंत्राच्या प्रभावाने शनिची साडेसातीचे नकारात्मक प्रभाव दूर होतात. शास्त्रानुसार या मंत्राचा जप सव्वा लाख वेळा केला पाहिजे.

महामृत्युंजय जप करण्याचे फायदे काय?य़

💠 अकाली मृत्यूपासून वाचवतो –

एखाद्या व्यक्तीच्या नशिबात जर अकाली मृत्यूचा योग असेल तर या मंत्राचा जप केल्याने मृत्यूचा योग टाळता येऊ शकतो. मान्यता आहे की, या मंत्राचा जप केल्याने एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढता येते. असे म्हणतात की जर आपल्या कुंडलीत तुम्हाला गंभीर आजार, अपघात किंवा मी आयुचा योग असेल तर या मंत्राचा जप केल्याने तो टाळता येतो.

💠 धन लाभ

जर तुम्हाला आर्थिक संकट येत असेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने आपले रखडलेले काम पूर्ण होईल. या मंत्रांचा जप शिवलिंगासमोर बसून करावा.

💠 चांगल्या आरोग्यासाठी

या मंत्राचा जप केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. सकाळी लवकर उठून आंघोळ करुन, स्वच्छ कपडे घालून रुद्राक्षाची जपमाळा घ्या आणि या मंत्राचा जप करा. याने आपले आरोग्य ठीक राहील.

💠 महामृत्युंजय जप करण्याचा नियम

– या मंत्रांचा जप करण्यात कोणत्याही प्रकारची अशुद्धता असू नये, म्हणजे बोलताना चुका करु नका.

– कुशच्या आसनावर बसून हा जप करावा. आसनाशिवाय जप करु नका.

– पूर्व दिशेने मुख करुन या मंत्राचा जप करा.

– जपावेळी भगवान शंकराला दुधाचा अभिषेक करा.

– मंत्राचा जप करताना माळ 108 वेळा जप पूर्ण झाल्यानंतरच उठा.

Chant Mahamrutunjaya Mantra To Please Lord Shiva Know The Rules And Benefits

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Dhumavati Jayanti 2021 | देवी धुमावतीची विधवा स्वरुपात पूजा का केली जाते? जाणून घ्या…

Vinayak Chaturthi 2021 | ज्येष्ठ महिन्याची विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI