बाबा वेंगापेक्षाही बाबा बिग्सची खतरनाक भविष्यवाणी, दरदरून घाम फुटेल असं भाकीत; थेट…
ब्रँडन डेल बिग्स नावाच्या भविष्यवेत्त्याने न्यू मॅड्रिड फॉल्ट लाइनवर रिश्टर स्केलवर 10 तीव्रतेचा भूकंप होण्याची भयानक भविष्यवाणी केली आहे. या भूकंपामुळे 1800 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मिसिसिपी नदीची दिशा बदलण्याचा आणि 6.5 तीव्रतेच्या आफ्टरशॉकचाही त्यांनी उल्लेख केला आहे.

अनेकांना भविष्यात डोकावून पाहण्याची सवय असते. आपलं पुढचं भविष्य काय असेल याची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. काही लोकांना तर भविष्यात देश आणि विदेशात काय घडेल याचीही माहिती जाणून घेण्याची आवड असते. त्यामुळेच लोक ज्योतिषाची वाट धरतात. त्यामुळे बाबा वेंगा, नास्त्रेदमस आणि किरो सारखे महान भविष्यवेत्ते आपल्या अचूक भविष्यवाणीमुळे प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा आणि नास्त्रदमसची तर आजही चर्चा होत असते. पण सध्या एक अजून भविष्यवेत्ता चर्चेत आहे. त्यांचं नाव ब्रँडन डेल बिग्स आहे. अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील एका चर्चमध्ये ते पादरी म्हणून कार्यरत आहेत. ते बिग्स बाबा म्हणूनही प्रसिद्ध आहेत. याच बिग्स बाबाने डोनाल्ड ट्रम यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. आता त्यांनी एका भयानक भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. मानव इतिहासात असा भूकंप कधीच झाला नसेल, असा भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आपल्याला ईश्वराने दर्शन दिल्याचा दावा ब्रँडन डेल बिग्स यांनी केला आहे. मला देवाने दर्शन देताना रिश्टर स्केलवर 10 तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचं दाखवलं. हा भूकंप प्रलयासारखा असणार आहे. या भूकंपात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कमीत कमी 1800 लोकांचा मृत्यू होईल. ज्या घरांचा बेस सीमेंट ब्लॉक्सवर आहे, ती सर्व घरे कोलमडून पडतील, असा दावा बिग्स यांनी केला आहे.
त्यांनी न्यू मॅड्रिट फॉल्ट लाइनवर भीषण भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली आहे. ही न्यू मॅड्रिड फॉल्ट लाइन अमेरिकेच्या मिसौरी, अर्कांसास, टेनेसी, केंटकी आणि इलिनॉइ येथून जाते. बिग्स यांच्या दाव्यानुसार, भूकंपानंतर एक चेन रिएक्शन होईल. त्यानंतर 6.5 तीव्रतेचा आफ्टरशॉक टेक्सारकाना (टेक्सास) हून ओक्लाहोमापर्यंत जाणवेल.
नद्या उलट्या वाहतील
हा भूकंप इतका भीषण असेल तरी मिसिसिपी नदीची दिशा बदलून जाईल. नदी उलटी वाहायला लागेल. त्यामुळे अजून मोठं नुकसान होणार आहे. वसंत ऋतूत हे भीषण संकट ओढवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. झाडांवर पानं येत असल्याचं मी पाहिलं. ही पाने वेगळीच होती. नवीन होती, असं त्यांनी म्हटलंय.
कोण आहे बाबा बिग्स?
ब्रँडन डेल बिग्स हे स्वत:ला ख्रिश्चन भविष्यवेत्ता समजतात. ते ओक्लाहोमा येथे राहतात. त्यांचं स्वत:चं यूट्यूब चॅनल आहे. आपल्या चॅनलवर ते भविष्यवाणी करत असतात. पण एखाद्या चर्चचे प्रमुख आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न होणार असल्याची त्यांनी अचूक भविष्यवाणी केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. 14 मार्च रोजी त्यांनी एक व्हिडिओ करून हा दावा केला होता. मी ट्रम्प यांना पाहिलं. ते उठत होते. त्यानंतर मी परत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होताना पाहिला. गोळी त्यांच्या कानाजवळून गेली. एवढ्या जवळून गेली की त्यांच्या कानाचा पडदा फाटला, अशी भविष्यवाणी बिग्स यांनी केली होती. त्यानंतर 13 जुलै रोजी म्हणजे भविष्यवाणीच्या तीन महिन्यानंतर ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात आली. सुदैवाने ते वाचले. कारण गोळी त्यांच्या कानाजवळून गेली होती.
