Budhwar Upay : बुधवारी केलेले आठ उपाय आहेत अत्यंत प्रभावी, श्री गणेशाच्या कृपेने होतील सर्व समस्या दूर

से मानले जाते की गणेशाशिवाय कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणून प्रथम त्यांची पूजा केली जाते. बुधवारी उपवास (Budhwar Upay) ठेवण्याबरोबरच नियमानुसार गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे.

Budhwar Upay : बुधवारी केलेले आठ उपाय आहेत अत्यंत प्रभावी, श्री गणेशाच्या कृपेने होतील सर्व समस्या दूर
गणपतीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:07 PM

मुंबई : बुधवार गणपतीच्या पूजेसाठी विशेष मानला जाते. कोणत्याही पूजेत आणि शुभ कार्यात गणेशजींचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की गणेशाशिवाय कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणून प्रथम त्यांची पूजा केली जाते. बुधवारी उपवास (Budhwar Upay) ठेवण्याबरोबरच नियमानुसार गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करतो त्याचे बाप्पा सर्व संकट दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. याशिवाय या दिवशी काही ज्योतिषीय उपाय केल्यास व्यवसायापासून नोकरीपर्यंत भरपूर यश मिळते. एवढेच नाही तर संपत्तीही वाढते. जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय करणे शुभ आहे.

बुधवारचे उपाय

1 बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

2 या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. असे केल्याने गणेश लवकर प्रसन्न होतो.

हे सुद्धा वाचा

3 बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्यावे. यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

4 बुधवारी माँ दुर्गेची पूजा करा. याशिवाय ‘ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे’ या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करा, बुध दोषापासून मुक्ती मिळेल.

५ या दिवशी श्रीगणेशाच्या डोक्यावर शेंदूर वाहावा, त्यानंतर कपाळावर लावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

6 बुधवारी करंगळीत पाचू घाला. असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते. परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या.

7 बुधवारी ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

8 जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.