chaitra purnima | जाणून घ्या कधी आहे चैत्र पौर्णिमा,शुभ मुहूर्त आणि महत्व

पौर्णिमा (purnima) हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस मानला जातो (Chaitra Purnima 2022). या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. याशिवाय, भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सत्यनारायण पूजा करतात.

chaitra purnima | जाणून घ्या कधी आहे चैत्र पौर्णिमा,शुभ मुहूर्त आणि महत्व
chaitra paurnima
मृणाल पाटील

|

Apr 14, 2022 | 7:00 AM

मुंबई : पौर्णिमा (purnima) हा हिंदू धर्मातील एक शुभ दिवस मानला जातो (Chaitra Purnima 2022). या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. याशिवाय, भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सत्यनारायण पूजा करतात. या वर्षी या दिवसाला हनुमान जयंती देखील (Hanuman Jayanti) साजरी केला जात आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस असतो. महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडले आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. श्री रामाचे परम भक्त हनुमानजी यांची जयंतीही याच दिवशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात सनातन धर्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान केले जाते. असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैती पूनम असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्री हरिची उपासना आणि उपवास करण्याचा नियम आहे. रात्री चंद्रदर्शन आणि अर्घ्य झाल्यावरच व्रत मोडते. चैत पौर्णिमेच्या दिवशी नदी, तीर्थक्षेत्र, तलाव आणि पाण्याच्या टाकीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते

चैत्र पौर्णिमा कधी आहे?

चैत्र पौर्णिमा 16 एप्रिल 2022, शनिवार रोजी होईल. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.

चैत्र पौर्णिमेचे महत्त्व

या शुभ दिवशी भक्त गंगा नदीत स्नान करतात. परंतू, यावेळी कोरोनोच्या सद्यस्थितीमुळे उत्सव काही वेगळा असेल. गंगा नदीत स्नान केल्याने भाविकांना त्यांच्या पापांपासून आणि त्रासातून मुक्तता मिळते असे मानले जाते. भक्त या दिवशी मंत्र जप करतात आणि सत्यनारायणाची पूजा करतात. तसेच, या दिवशी त्यांनी लोकप्रिय सत्यनारायण कथेचं पठण केलं जातं. याशिवाय भक्त गरीबांना दान करतात आणि या दिवशी गरजूंना मदत करतात. भगवान हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. भक्त या दिवशी भगवान हनुमानाची पूजा करतात आणि ते एक दिवस उपवास करतात.

या मंत्रांचा जप करा

चैत्र पौर्णिमेला चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करून ‘ओम स्रीं श्रोण स: चंद्रमासे नमः’ किंवा ‘ओम ॐ क्लीं सोमय नमः’ या मंत्राचा जप करावा, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें