Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाताची पूजा विधी, आरती आणि महत्त्व…

आज नवरात्रीचा पाचवां दिवस आहे. या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा-अर्चना केली जाते (Chaitra Navratri 2021). स्कंदमाताला देवी दुर्गाचं मातृत्व स्वरुप म्हटलं जातं

Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाताची पूजा विधी, आरती आणि महत्त्व...
skandmata devi
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 9:20 AM

मुंबई : आज नवरात्रीचा पाचवां दिवस आहे. या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा-अर्चना केली जाते (Chaitra Navratri 2021). स्कंदमाताला देवी दुर्गाचं मातृत्व स्वरुप म्हटलं जातं (Chaitra Navratri 2021 Day 5 Know How To Worship Goddess Skandmata).

स्कंदमाताच्या चार भुजा आहेत. त्यांचं वाहन वाघ आहे. स्कंदमाता कमळाच्या आसनावर विराजमान असतात. त्यामुळे त्यांना पद्मासना देवीही म्हटलं जातं. चला जाणून घेऊ स्कंदमाताची पूजा विधी, कथा, आरती आणि महत्त्वाबाबत –

पूजेचा विधी

सकाली लवकर उठून स्नान करा नंतर स्वच्छ कपडे परिधान करुन देवी स्कंदमाताची पूजा करा. सर्वात पहिले देवीला गंगाजल अर्पण करा. त्यानंतर फुल, अक्षता, कुंकू अर्पण करा. मग देवीला धूप, दीवा लावा. स्कंदमाताला नैवेद्य म्हणून केळी दाखवा. या दिवसी दान पुण्य करण्याचं खास महत्व असतं.

पूजेचं महत्व

स्कंदमाताची पूजा विधीवत केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. त्याशिवाय आरोग्यासंबंधी समस्या दूर होतात. देवी स्कंदमाताच्या आर्शीवादाने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.

स्कंदमाताचा मंत्र

या देवी सर्वभूतेषु मां स्कंदमाता रुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

स्कंदमाताची आरती

जय तेरी हो स्कंद माता, पांचवा नाम तुम्हारा आता, सब के मन की जानन हारी, जग जननी सब की महतारी. तेरी ज्योत जलाता रहूं मैं, हरदम तुम्हे ध्याता रहूं मैं, कई नामो से तुझे पुकारा, मुझे एक है तेरा सहारा. कहीं पहाड़ों पर है डेरा, कई शहरों में तेरा बसेरा. हर मंदिर में तेरे नजारे गुण गाये, तेरे भगत प्यारे भगति. अपनी मुझे दिला दो शक्ति, मेरी बिगड़ी बना दो. इन्दर आदी देवता मिल सारे, करे पुकार तुम्हारे द्वारे. दुष्ट दत्य जब चढ़ कर आये, तुम ही खंडा हाथ उठाये दासो को सदा बचाने आई, चमन की आस पुजाने आई.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, तारकासूर नावाच्या राक्षसाने घोर तपस्या करुन ब्रह्माजींना प्रसन्न केलं आणि अमर होण्याचा वरदान मागितला. ब्रह्माजींनी तारकासूरला समजवलं कीस या जगात सर्वांचा मृत्यू निश्चित आहे. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यूही अटळ आहे. त्यानंतर तारकासूराने ब्रह्माजींना भगवान शिवच्या पुत्राच्या हाती मृत्यूचा वरदान मागितला. त्याने विचार केला की भगवान शिव कधीही विवाह करणार नाही त्यामुळे त्यांचा पुत्र मला कधीही मारु शकत नाही. तारकासूर लोकांवर अत्याचार करु लागला. हे पाहून देवतांनी भगवान शिवची प्रार्थना केली की ते तारकासूरापासून त्यांची मुक्ती व्हावी. त्यानंतर भगवान शिवने देवी पार्वतीशी लग्न केलं. त्यांचा पुत्र कार्तिकेय यांनी मोठं होऊन तारकासूराचा वध केला. स्कंदमाता ही कार्तियकेयची आई होती.

Chaitra Navratri 2021 Day 5 Know How To Worship Goddess Skandmata

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस, देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या सुटतील…

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.