Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस, देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या सुटतील…

आज चैत्र नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते (Goddess Chandraghanta). भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात.

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा तिसरा दिवस, देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या सुटतील...
Maa Chandraghanta
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 12:16 PM

मुंबई : आज चैत्र नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते (Goddess Chandraghanta). भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील तेज वाढतं. म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा म्हणतात (Chaitra Navratri 2021 Day 3 Goddess Chandraghanta Know How To Worship).

चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रामध्ये राहतो.

आज चैत्र शुक्ल पक्षाच्या तिथीला विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजेचा शुभ वेळ 3 वाजण्यापूर्वीचा आहे. यानंतर, चतुर्थी सुरु होईल. देवी चंद्रघंटाची उपासना कशी करावी, मंत्र आणि कथेविषयी जाणून घेऊया –

देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी

देवी चंद्रघंटाची मूर्ती आणि फोटोला एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधीवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी “ऊं देवी चंद्रघंटायै नम:” या मंत्राचा जप करा. तसेच, दुर्गा चालीसा आणि दुर्गा आरतीही करु शकता.

पूजेचं महत्व

देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने सुख-समृद्धी नांदते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहातं. तसेच, वैवाहिक जीवन आणि विवाहासंबंधीत समस्या सुटतात.

देवी चंद्रघंटाची आरती

जय मां चंद्रघंटा सुख धाम। पूर्ण कीजो मेरे सभी काम। चंद्र समान तुम शीतल दाती।चंद्र तेज किरणों में समाती। क्रोध को शांत करने वाली। मीठे बोल सिखाने वाली। मन की मालक मन भाती हो। चंद्र घंटा तुम वरदाती हो। सुंदर भाव को लाने वाली। हर संकट मे बचाने वाली। हर बुधवार जो तुझे ध्याये। श्रद्धा सहित जो विनय सुनाएं। मूर्ति चंद्र आकार बनाएं। सन्मुख घी की ज्योति जलाएं। शीश झुका कहे मन की बाता। पूर्ण आस करो जगदाता। कांचीपुर स्थान तुम्हारा। करनाटिका में मान तुम्हारा। नाम तेरा रटूं महारानी। भक्त की रक्षा करो भवानी।

Chaitra Navratri 2021 Day 3 Goddess Chandraghanta Know How To Worship

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.