Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस, देवी सिद्धीदात्रीची पूजा कशी करावी, जाणून घ्या महत्त्व आणि मंत्र…

आज महानवमी आहे. नवमी तिथी रात्री 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल (Chaitra Navratri 2021). नवरात्रीच्या 9 व्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या रुपात देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते.

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस, देवी सिद्धीदात्रीची पूजा कशी करावी, जाणून घ्या महत्त्व आणि मंत्र...
goddess siddhidatri
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:04 AM

मुंबई : आज महानवमी आहे. नवमी तिथी रात्री 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल (Chaitra Navratri 2021). नवरात्रीच्या 9 व्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या रुपात देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. नवमी तिथीला नवरात्रीचे उपवास ठेवणारे भाविक कन्या पूजनानंतर त्यांचा उपवास सोडतात. पण, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे यावेळी कन्या पूजन करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलींना नैवेद्य देऊ शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही गरजूंना ऑनलाईन देणगीही देऊ शकता (Chaitra Navratri 2021 Day 9 How To Worship Goddess Siddhidatri).

धार्मिक पुराणांमध्ये, सुपत्रांना दिलेलं दान हे महादान असे मानले जाते. नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी भाविकांनी आई सिद्धिदात्रीची पूजा-अर्चना केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, नवमीच्या दिवशी आई सिद्धिदात्रीची पूजा केल्यास भाविकांना विशेष सिद्धीची प्राप्ती होते. असे मानले जाते की भगवान महादेव यांनीही सिद्धी प्राप्त करण्यासाठी सिद्धीदात्रीची तपस्या केली होती.

आई सिद्धीदात्रीचे स्वरूप:

देवी सिद्धीभुजा दात्रीचे रुप आभामंडळ युक्त आहे. देवी सिद्धीदात्री लाल रंगाची साडी परिधान करुन कमळावर विराजमान आहेत. देवीचे चार हात आहेत. डाव्या हातात देवीने गदा परिधान केली आहे आणि देवीच्या उजव्या हातात कमळ आहे आणि एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. आईच्या हाती शंख आणि सुदर्शन चक्र देखील आहे. देवी कमळावर विराजमान आहे.

देवी पुराणात असा उल्लेख आहे की भगवान शिवने सिद्धी प्राप्तीसाठी देवी सिद्धीदात्रीची तपस्या केली, त्यानंतर त्यांचे अर्धे शरीर स्त्रीचे झाले. देवीच्या आशीर्वादामुळे भगवान शिव अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले.

देवी सिद्धीदात्रीची आरती :

जय सिद्धिदात्री तू सिद्धि की दाता तू भक्तों की रक्षक तू दासों की माता, तेरा नाम लेते ही मिलती है सिद्धि तेरे नाम से मन की होती है शुद्धि कठिन काम सिद्ध कराती हो तुम हाथ, सेवक, केसर, धरती हो तुम, तेरी पूजा में न कोई विधि है तू जगदंबे दाती, तू सर्वसिद्धि है रविवार को तेरा सुमरिन करे जो तेरी मूर्ति को ही मन में धरे जो, तू सब काज उसके कराती हो पूरे कभी काम उस के रहे न अधूरे तुम्हारी दया और तुम्हारी यह माया रखे जिसके सर पैर मैया अपनी छाया, सर्व सिद्धि दाती वो है भाग्यशाली जो है तेरे दर का ही अम्बे सवाली, हिमाचल है पर्वत जहां वास तेरा, महानंदा मंदिर में है वास तेरा, मुझे आसरा है तुम्हारा ही माता वंदना है सवाली तू जिसकी दाता…

देवी सिद्धीदात्रीची मंत्र :

या देवी सर्वभू‍तेषु सिद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:

Chaitra Navratri 2021 Day 9 How To Worship Goddess Siddhidatri

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस, जाणून घ्या देवी काळरात्रीची पौराणिक कथा, महत्व आणि पूजा विधी

Chaitra Navratri 2021 | आज चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस, जाणून घ्या देवी महागौरीची कथा…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.