Chanakya Neeti : या 5 जणांना झोपेतून उठवण्याची चूक कधीच करू नका, अन्यथा पडेल प्राणाशी गाठ
आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामधून त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी उपदेश केला आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा काही गोष्टी असतात त्यांना झोपेतून कधीही उठवू नका, नाहीतर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या आपल्या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. मानवाच्या कल्याणासाठी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. थोडक्यात काय तर माणसानं जीवन कसं जगावं? जीवन जगत असताना कोणत्या चुका करू नयेत? त्या चुकांचे परिणाम काय असू शकतात? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात असे पाच जण आहेत, ज्यांना तुम्ही कधीच झोपेतून उठवण्याची चूक करू नका, कारण ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
राजा – चाणक्य म्हणतात कुठल्याही राज्यात राजा ही सर्वशक्तिमान व्यक्ती असते. त्यामुळे तुम्ही कधीही राजाची नाराजी ओढून घेऊ नका, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. राजा जर तुमच्यावर प्रसन्न झाला तर तो नक्कीच तुम्हाला इनाम देईल, मात्र जर राजा तुमच्यावर नाराज झाला तर तो तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षाही देऊ शकतो. त्यामुळे जर राजा गाढ झोपला असेल तर त्याला झोपेतून उठवण्याची चूक करू नका.
सिंह – चाणक्य पुढे म्हणतात की जर तुम्ही एखाद्या जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला आहात, आणि तिथे जर सिंह झोपलेला असेल तर त्याच्यापासून चार हाताचं अंतर ठेवून जंगलातून बाहेर पडा, त्याची झोप मोडू नका, कारण सिंहाची जर झोप मोडली तर तुमचा जीव संकटात येऊ शकतो.
लहान बालक – चाणक्य म्हणतात एखादं लहान मुलं जर शांत झोपलं असेल तर त्याला झोपेतून उठवू नका, कारण त्याची जर झोप पूर्ण झाली नाही तर तो रडणार, तुम्हाला त्यामुळे प्रचंड त्रास होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांना कधीही झोपेतून उठवू नये.
श्वान – चाणक्य म्हणतात जर श्वान शांत झोपले असेल तर त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करू नका, कारण श्वान जर झोपेतून उठलं तर ते तुम्हाला चावा देखील घेऊ शकतं, त्यामुळे तुमचा जीव संकटात सापडू शकतो.
साप – चाणक्य म्हणतात जर साप गाढ झोपला असेल तर त्याला झोपेतून उठवण्याची चूक करू नका, त्याने चावा घेतल्यास तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
