Chanakya Neeti : या तीन लोकांकडे कधीच पैसा टिकत नाही, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य हे एक महान विचारवंत, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

चाणक्य हे एक महान विचारवंत, कूटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांच्या काळात चाणक्य यांचा सल्ला घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे यायचे. चाणक्य जसे कूटनीती तज्ज्ञ होते, तसेच ते एक चांगले अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसानं पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैशांची कुठे बचत करावी अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी असे पाच लोक सांगितले आहेत, की त्यांनी कितीही पैसा कमावला तरी त्यांच्या हातात पैसा टिकत नाही, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात.
आर्य चाणक्य म्हणतात जगात अशी काही लोक असतात ज्यांनी कितीही पैसा कमावला तरी तो त्यांच्या हातात टिकत नाही. लक्ष्मी मातेची अशा लोकांवर कृपा नसते, त्यामागे नेमकं काय कारण आहे, हे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे. जाणून घेऊयात आर्य चाणक्य नेमकं काय म्हणतात.
स्पष्ट बोलणारे लोक – आर्य चाणक्य म्हणतात जगात असे काही लोक असतात ज्यांचा स्वभाव कठोर असतो, जे लोक स्पष्ट बोलतात. अशा लोकांनी कितीही धन कमावलं तरी त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. या उलट जे लोक गोड बोलतात, गोड बोलून आपलं काम साधतात, अशा लोकांकडे कधीही पैशांना कमी नसते.
गरजेपेक्षा जास्त खाणारे लोक – चाणक्य म्हणतात जगात असे काही लोक असतात जे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खातात, अशा लोकांकडे देखील कधीच पैसा टिकत नाही.
अस्वच्छता – चाणक्य म्हणतात ज्या घरात अस्वच्छता असते, जे लोक अस्वच्छ राहातात अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही, त्यांना सतत पैशांची कमी जाणवते .
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
