AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : जेव्हा तुम्हाला वाटेल आता आयुष्यात सगळं संपलं, तेव्हा चाणक्य यांच्या या 3 गोष्टी आठवा

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ फक्त राजा आणि राज्यकारभाराशीच संबंधित नाही तर माणसानं आपलं आयुष्य कसं जागवं? याचं तत्त्वज्ञान या ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे.

Chanakya Neeti : जेव्हा तुम्हाला वाटेल आता आयुष्यात सगळं संपलं, तेव्हा चाणक्य  यांच्या या 3 गोष्टी आठवा
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 7:17 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, त्या काळात चाणक्य यांनी जे विचार या ग्रंथामध्ये मांडले आहेत, ते आजच्या युगातही तर्कसंगत वाटतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. कधी-कधी परिस्थिती अशी येते, की माणूस पूर्णपणे खचून जातो. तो आपला आत्मविश्वास गमावून बसतो, आता आयुष्यात सगळं संपलं आहे, असं त्याला वाटू लागतं, त्याच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागतात, त्याला पुढचा कोणताच मार्ग दिसत नाही, अशा अवस्थेत काय करावं? हे चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?

संकटांचा सिंहाप्रमाणे सामना करा – चाणक्य म्हणतात तुमच्यावर कितीही मोठी संकट असू द्या, घाबरून जाऊ नका, त्या संकटाचा सामना हा सिंहाप्रमाणे करा. ज्याप्रमाणे सिंह शिकार करण्यापूर्वी दोन पाऊलं मागे जातो, तसंच आपल्याही आयुष्यात घडलं आहे, असं समजा आणि त्यानंतर अशी झेप घ्या की तुम्हाला यश हे मिळालंच पाहिजे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडू नका.

संयम – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे ज्या गोष्टीची आवश्यकता असते तो म्हणजे संयम, चाणक्य म्हणतात तुमच्या पडत्या काळात तुम्ही संयम ठेवा, मात्र प्रयत्न करणं कधीही सोडू नका, एक दिवस हाच संयम तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे.

वेळ निघून जाते – एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ कधीही बसून राहत नाही, वाईट वेळ कधी न कधी निघून जाणार आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा आत्मविश्वासानं कामाला लागा, जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार