Chanakya Niti | आयुष्यात यशाच्या शोधात असाल तर, 4 गोष्टींविषयी मनात श्रद्धा बाळगा, यश तुमचेच असेल

यश मिळवण्यासाठी आयुष्यात 4 गोष्टींची प्रति श्रद्धा बाळगली पाहीजे असे सांगितले. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Chanakya Niti | आयुष्यात यशाच्या शोधात असाल तर, 4 गोष्टींविषयी मनात श्रद्धा बाळगा, यश तुमचेच असेल
गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

मुंबई : आपण सर्वजण आयुष्यात यश मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. एखादे ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करत असतो. पण काही जणांना खूप मेहनत करुन देखील यश मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये या समस्येवर उपाय सांगितला आहे.

आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, रणनीतिकार, राजकारणी होते. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधी हार मानली नाही. प्रत्येक समस्येवर त्यांनी मात केली. त्यांचे अनुभव इतरांना कळावे म्हणून त्यांनी चाणक्य नीती लिहीली. यामध्ये त्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात 4 गोष्टींची प्रति श्रद्धा बाळगली पाहीजे असे सांगितले. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

आईची सेवा करा

जगात सर्वात महत्त्वाचे काही असेल तर ती आई आहे. म्हणूनच की काय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण प्रचलित आहे. जो व्यक्ती आपल्या आईचा आदर करतो, तिची काळजी घेतो, त्याच्या आयुष्यात कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. त्या व्यक्तीचा वाईट काळ सुद्धा कालांतराने चांगल्या वेळेत बदलतो.

गायत्री मंत्र

गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. या मंत्राचा जप आपण मनापासून केला तर आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. अशी व्यक्ती आयुष्यात काहीही सहज साध्य करू शकते.

एकादशी तिथी

आचार्य चाणक्यांनीही एकादशीची तिथी अत्यंत पवित्र मानली आहे. या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात. त्याच्या आयुष्यची एक नवीन सुरूवात होते. अशी मान्यता आहे.

अन्न दान

अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. कोणत्याही भुकेल्याला अन्नदान करणे आणि तहानलेल्याला पाणी देणे पुण्याचे काम मानले जाते. आयुष्यात आपल्याकडे अन्न गोष्ट कमी असेल तरी त्यातील काही भाग हा तुम्ही दान करु शकता. अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधी कठीण प्रसंग येतात आणि जातात सुद्धा. आयुष्यातील प्रत्येक संकटातून ते सहीसलामत बाहेर पडतात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा

Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील


Published On - 8:09 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI