Chanakya Niti : याच 3 कारणांमुळे होतात 99 टक्के घटस्फोट, चाणक्य यांनी शेकडो वर्ष आधीच सांगितलंय
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पती-पत्नीच्या नात्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

आज नात्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंता वाढला आहे. अनेक घरात सतत पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू असतात, यामुळे घर अशांत राहतं, अनेक ठिकाणी तर आपण पहातो लग्नाला अवघे काही महिने होत नाही तर तोच विषय घटस्फोटापर्यंत पोहोचतो, आज अशा जोडप्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहेत, जे आपल्या लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये घटस्फोट घेत आहेत. मात्र हे असं का घडत आहे? याची कारण आर्य चाणक्य यांनी शेकडो वर्ष आधीच सांगून ठेवली आहेत. चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पती-पत्नीमधील नात्यांसाठी मार्गदर्शक ठरतात, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
वैयक्तिक आयुष्य – चाणक्य म्हणतात पती-पत्नीमध्ये असे अनेक खासगी क्षण असतात, खासगी गोष्टी असता, ज्या त्या दोघांमध्ये ठेवल्या पाहिजेत अशा गोष्टी कधीही पती किंवा पत्नीने आपल्या मित्र मैत्रिणींसोबत किंवा कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला सांगून नयेत, यामुळे तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो.
आदर – चाणक्य म्हणतात पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पती-पत्नी ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. यातील एक चाक जरी निखळलं तर संसाररूपी रथ डगमगल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संसारात जेवढं महत्त्व पतीचं असंत तेवढंच किंवा त्याहीपेक्षा अधिक महत्त्व हे पत्नीच असतं. त्यामुळे तुम्ही एकमेकांचा आदर केला पाहिजे, तुम्ही जर एकमेकांचा मनापासून आदर करत असाल तर परिस्थिती कधीच घटस्फोटापर्यंत पोहचणार नाही.
विश्वास – चाणक्य म्हणतात संसारामध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. नातं कोणतंही असो त्याचा पाया विश्वासच असतो. त्यामुळे पती आणि पत्नीचा एकमेकांवर विश्वास असला पाहिजे, जर त्यांचा एकमेकांवर विश्वास असेल तर ते नातं अधिक मजबूत बनतं, आणि त्यांच्यावर कधीही घटस्फोटाची वेळ येत नाही.
मैत्रीचे नाते – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जसा व्यवहार ठेवता, तसाच व्यवहार तुमच्या पती किंवा पत्नीसोबत ठेवा. थोडक्यात काय तर पती-पत्नीच्या नात्यामध्ये मैत्री असावी, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला मन मोकळेपणाने सांगू शकाल आणि तेवढ्याच मन मोकळेपणाने तुमचा जोडीदार देखील तुम्हाला सल्ला देईल.
