Chanakya Niti : या 5 जागांवर थांबलात तर राजाचाही होतो रंक, चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाचं वर्तन कसं असावं? याबाबत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी वर्तनाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर काय करावं? आणि काय करू नये याबाबत देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला दिला आहे. चाणक्य म्हणतात आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पैसा, त्यामुळे तुम्ही पैसा बचत करायला शिकलं पाहिजे. संकट काळात हाच पैसा तुमच्या उपयोगी येणार आहे. तसेच चाणक्य यांनी अशा पाच जागा सांगितल्या आहेत, ते म्हणतात तिथे तुम्ही चुकूनही थांबू नका, अन्यथा तुमच्याजवळ पैसा टिकणार नाही. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जिथे तुम्हाला कामाचा योग्य मोबदला मिळत नाही – चाणक्य म्हणतात ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही, तिथे चुकूनही थांबू नका, तिथे काम करू नका. लक्षात ठेवा कामाचा योग्य मोबदला हा तुमचा अधिकार आहे.
जिथे कोणी धनवा नाही – आर्य चाणक्य म्हणतात ज्या जागी एकही व्यक्ती धनवान नाही अशा ठिकाणी तुम्ही राहू नका, कारण तेथील विचारांचा प्रभाव हा न कळत तुमच्यावर पडू शकतो.
जिथे शिक्षण नाही- चाणक्य म्हणतात तुम्ही शिक्षण घेतलं तरच त्यातून तुमच्या बुद्धीचा विकास होतो, तुम्ही नोकरीच्या योग्य होतात. शिक्षणामधूनच धनाची प्राप्ती होते, त्यामुळे जिथे शिक्षण नाही अशा ठिकाणी राहाणं अयोग्य आहे.
योग्यते अनुसार नोकरी मिळत नसेल – चाणक्य म्हणतात जिथे तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार, प्रतिभेनुसार नोकरी मिळत नसेल तर तिथे थांबू नका.
जिथे डॉक्टर नसेल- आर्य चाणक्य म्हणतात जिथे आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध नसतील, जिथे डॉक्टर नसतील तिथे राहु नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
