Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे तीन गुण असलेली पत्नी म्हणजे पुरुषांसाठी वरदानच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. आयुष्य जगत असताना कोणत्या चुका करू नयेत? काय करावं याचं थोडक्यात सार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. आदर्श पती कसा असावा, आदर्श पत्नी कशी असावी, आपला शत्रू कसा ओळखावा, मित्र कोणाला म्हणावे? राजा कसा असावा, त्याचा प्रजेसोबतचा व्यवहार कसा असावा? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंंथामध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श पत्नीची काही लक्षणं सांगितली आहेत. जर ही लक्षणं ज्या स्त्रीकडे असतील अशी स्त्री आपल्या पतीसाठी भाग्यवान असते. तिच्यामुळे घराची भरभराट होते, पतीची प्रगती होते. घरात पैशांची कधीही कमी राहत नाही, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?
पैशांची बचत – आर्य चाणक्य म्हणतात ज्या स्त्रीला काट कसरीने संसार करण्याची सवय असते. जी स्त्री कधीही आपल्या पतीचे पैसे अनावश्य वस्तुंमध्ये खर्च करत नाही, अशा दाम्पत्यांचा संसार सुखाचा होतो. पत्नीने बचत केलेले पैसे त्यांना त्यांच्या संकट काळात उपयोगी पडतात.
प्रामाणिक पणा – आर्य चाणक्य म्हणतात स्त्री असो अथवा पुरुष दोघांनी देखील लग्नानंतर एकमेकांसोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. पती -पत्नी ही संसाराची दोन चाके असतात. ती जर समान चालली तरच संसाराचा रथ व्यवस्थित चालतो. त्यामुळे नात्यामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे.
मुलांना संस्कार – आर्य चाणक्य म्हणतात पती अर्थजनासाठी बाहेर पडतो. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी ही स्त्रीवर असते. आईच मुलांवर उत्तम संस्कार करू शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)