Chanakya Niti : पत्नी आणि मुलांसमोर चुकूनही बोलू नका या गोष्टी, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये पतीचं पत्नीसोबत नातं कसं असावं? आपल्या मुलांवर वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजच्या काळातही मार्गदर्शक वाटतात. जसं की आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पती कसा असावा? आपल्या मुलांवर आई-वडिलांनी चांगले संस्कार कसे करावेत? अशा अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन प्रमुख चाके असतात. जोपर्यंत ही दोन चाकं समान गतीनं धावत आहेत, तोपर्यंत हा रथ सदैव धावता राहतो, मात्र यातील एखादं चाक जरी मागे -पुढे झालं किंवा गळालं तर मग हा रथ पुढे जाणार नाही. त्यामुळे पती-पत्नीने कायम एकमेकांचा आदर केला पाहिजे. लक्षात ठेवा जर पती पैसे कमावून आणत असेल तर पत्नी देखील घरात प्रंचड कष्ट घेत असते, ती आपल्या मुलांवर संस्काराचं काम करते असं चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.
अपशब्द – चाणक्य म्हणतात घरातील कुटुंबप्रमुखाचं हे कर्तव्य आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबाबत आपल्या घरात बोलत असतात, तेव्हा त्याच्याबद्दल कधीही आपल्या घरच्यांसमोर पत्नी आणि मुलांसमोर अपशब्द बोलू नका. कारण त्याचा नकारात्मक परिणाम हा तुमच्या मुलांवर देखील होऊ शकतो.
पत्नीचा आदर करा – चाणक्य म्हणतात सुखी संसारासाठी पत्नीचा नेहमी आदर केला पाहिजे, कारण तुमची पत्नी ही घरातील एकमेव अशी व्यक्ती असते, जी कसलीही अपेक्षा न करता तुमचा संसार सुखी करते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही पत्नीवर चिडाल रागवाल तेव्हा तिच्याबद्दल अपशब्द वापरू नका, तिचा अपमान करू नका.
पत्नीच्या घरच्यांचा आदर – चाणक्य म्हणतात कधीही तुमच्या मुलांसमोर किंवा पत्नीसमोर तिच्या घरच्यांबद्दल वाईट बोलू नका. लक्षात ठेवा पत्नी काहीही सहन करू शकते, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या घरच्यांबद्दल अपशब्द वापरता किंवा तिच्या समोर तिच्या माहेरच्या लोकांचा अनादर करता तेव्हा ही गोष्टी ती कधीही सहन करू शकणार नाही. त्यामुळे कधीही पत्नीसमोर तिच्या घरच्यांबद्दल वाईट बोलू नका.
नकारात्मकता – चाणक्य म्हणतात आपल्या पत्नीसमोर किंवा मुलांसमोर अशा गोष्टी चुकूनही बोलू नका, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता वाढेल. घरात कुटुंबप्रमुखानं नेहमी अशाच गोष्टी बोलाव्यात ज्यामुळे सकारात्मकता टिकून राहील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
