AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुमच्या यशात हे चार लोक कायम अडथळा निर्माण करतात, चाणक्य म्हणतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात समजात असे काही लोक असतात ज्यांना कधीच तुमचं यश बघवलं जातं नाही. ते कायम तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीच सुखी नसतात. त्यामुळे या लोकांकडे दुर्लक्ष करून तुम्ही पुढे चालत राहावं, यातच तुमचं हीत आहे.

Chanakya Niti : तुमच्या यशात हे चार लोक कायम अडथळा निर्माण करतात, चाणक्य म्हणतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या समाजात असे काही लोक असतात जे सतत तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांनी कधीही कोणाचंही सुख बघवत नाही. त्यामुळे तुम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, परंतु अशा लोकांपासून सावध देखील राहिलं पाहिजे. जर तुम्ही बेसावध असाल तर तुमचा घात झालाच म्हणून समजा. जोपर्यंत तुम्ही गरीब असतात, तोपर्यंत या समाजात तुमचा एकही शत्रू नसतो. परंतु तुम्ही प्रगतीला सुरुवात केली, श्रीमंत झालात की लोक तुमचा द्वेष करू लागतात, कारण त्यांना तुमचं सुख बघवत नाही, त्यामुळे अशी लोक तुम्हाला ओळखता आली पाहिजेत. यातील काही लोक ही तर अगदी तुमच्या खूप जवळची असतात, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वाईट विचार करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमच्याबद्दल कायम त्यांच्या मनात वाईट विचार ठेवून असतात, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. अशा लोकांना फार महत्त्व देऊ नका, किंवा त्यांना घाबरू देखील नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. परंतु अशा लोकांपासून सावध राहा. कारण असे लोक नेहमीच तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतात. तुमच्यासोबत झालेली कोणतीही चांगली गोष्ट हे लोक पाहू शकत नाहीत, तुमचं वाईट कसं करता येईल याचाच हे लोक सारखा विचार करत असतात.

अज्ञानी लोक – चाणक्य म्हणता जे लोक अज्ञानी असतात, अशा लोकांसोबत कधीही जवळीक करू नये. कारण तुम्ही जर अशा लोकांसोबत जवळीक केली तर असे लोक आपलं स्वत:चं तर वाटोळं करतातच पंरतु त्यांच्यामुळे तुम्ही देखील मोठ्या संकटात सापडतात, त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करा, त्यांना फार महत्त्व देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात या जगात काही कपटी लोक असतात, अशा लोकांना त्यांच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तुम्ही अशा लोकांचं कितीही भलं करा, परंतु एक दिवस हे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा घात करणारच. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

रागीट लोक – चाणक्य म्हणतात जे लोक रागीट असतात, ज्यांना लगेच राग येतो, अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. त्यांच्यासोबत केलेली मैत्री तुम्हाला महागात पडू शकतो. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...