AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असा मुलगा जन्माला न आलेला बरा, करतो संपूर्ण कुटुंबाचा नाश

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात दोन अवगुणी मुलांपेक्षा कधीही एक गुणी मुलगा असणं हे चांगलं, कारण अशी मुलं कुटुंबाचा उद्धार करतात. तर अवगुणी मुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचा नाश होतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : असा मुलगा जन्माला न आलेला बरा, करतो संपूर्ण कुटुंबाचा नाश
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 25, 2026 | 10:22 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात एखाद्या कुटुंबात दोन अवगुणी मुलं असतील तर त्यांच्यापेक्षा एक गुणी मुलगा असलेला कधीही चांगला. जर कुटुंबामध्ये अवगुणी मुलं जन्माला आली तर ती संपूर्ण कुटुंबाचा नाश करतात. मात्र जर गुणी मुलगा जन्माला आला तर तो मात्र संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करतो. चाणक्य पुढे असंही म्हणतात यामध्ये आई-वडिलांची देखील भूमिका महत्त्वाची असते, मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा ती चिखलाच्या गोळ्या सारखी असतात, ज्याप्रमाणे कुंभार चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे आई -वडि‍लांची भूमिका असते. मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ही आई-वडिलांचीच असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात जो मुलगा शिक्षण घेत नाही, अशिक्षित राहतो, असा मुलगा अवगुणी असतो. जो मुलगा अशिक्षित असतो, तो कधीही आपलं कुटुंब चांगल्या प्रकार सांभाळू शकत नाही, कालांतराने अशा कुटुंबाचा नाश होतो. त्यामुळे मुलांना चांगलं शिक्षण देणं ही जशी आई-वडिलांची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे ते शिक्षण ग्रहण करणं आणि त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करणं ही मुलाची जबाबदारी असते.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात ज्या मुलांना वाईट संगत लागते, असा मुलगा आपल्या कुळाचा सर्वनाश करतो. त्यामुळे आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? तो कोणाच्या संगतीमध्ये आहे, याकडे आई-वडिलांनी लक्ष दिलेच पाहिजे. जर मुलगा वाईट संगतीमध्ये आहे, असं वाटत असेल तर त्याला त्यापासून परावर्तीत केलं पाहिजे.

आळशी मुलगा – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही, जर तुमचा मुलगा हा आळशी असेल तर त्याच्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. त्यामुळे मुलाला कधीही आळशी होऊ देऊ नका, त्याला लहानपणापासूनच कष्टाची सवय लावा, तो जेव्हा मोठा होईल, काम करायला सुरुवात करेल तेव्हा ही सवय त्याच्या फायद्याची ठरू शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...