AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ तीन लोकांची संगत आजच सोडा, अन्यथा व्हाल बरबाद

आर्य चाणक्य हे महान कुटुनीती तज्ज्ञ आणि अर्थ तज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अशा काही सवयी सांगितल्या आहेत, या सवयी ज्या व्यक्तीला असतील त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला ते देतात.

Chanakya Niti : 'या' तीन लोकांची संगत आजच सोडा, अन्यथा व्हाल बरबाद
| Updated on: Jun 20, 2025 | 9:15 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटुनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. मानसानं आयुष्य कसं जगावं? आयुष्य जगत असताना काय करावं? याची अनेक उदाहारणं आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंंथामध्ये दिली आहे. आयुष्यात काय करावं? काय करू नये? कोणत्या लोकांची संगत चांगली आहे? कोणती संगत वाईट आहे? व्यक्तीची कर्तव्य काय आहेत? आपला शत्रू कोण? मित्र कोण? अशी एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

आर्य चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात, ज्या सवयी एकदा जर मानसाला लागल्या तर आयुष्यभर सुटत नाही. या सवयींमुळे व्यक्तीचं आयुष्य बरबाद होतं. त्यामुळे या सवयी ज्या लोकांना आहेत अशा व्यक्तींपासून तुम्ही कायम दूर राहिलं पाहिजे, त्यातच तुमचं हीत आहे, जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या सवयी? आर्य चाणक्य यांनी काय म्हटलं आहे?

कामाचा कंटाळा – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी कामाचा कंटाळा करतात, अशा लोकांपासून दूरच राहा. कारण तुम्ही जर अशा लोकांसोबत राहिले तर ती सवय तुम्हाला देखील लागू शकते. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

व्यसनी लोकांपासून दूर राहा –  आर्य चाणक्य म्हणतात व्यसन हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यसनामुळे तुमच्या आयुष्याचं वाटोळ होतं. त्यामुळे तुम्ही व्यसन करता कामा नये, तसेच व्यसनी लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण ती सवय तुम्हालाही लागू शकते.

जुगार   – आर्य चाणक्य म्हणतात जुगार ही एक वाईट सवय आहे, ही जर सवय तुम्हाला लागली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे जुगारी लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?