AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका, पश्चाताप कराल, चाणक्य काय सांगतात?

चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समजात असे काही लोक असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या तीन लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका, पश्चाताप कराल, चाणक्य काय सांगतात?
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 9:24 PM
Share

आर्य चाणक्य हे एक विचारवंत तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की समाजात असे काही लोक असतात, ज्यांच्यावर कधीही विश्वास केला जाऊ शकत नाही. जर तुम्ही अशा लोकांवर विश्वास केला तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. त्याची फार मोठी किंमत तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोजावी लागू शकते. कधी-कधी अशा लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला तुमचा जीव देखील गमवावा लागू शकतो. त्यामुळे अशा लोकांपासून मानसानं नेहमी सावध असलं पाहिजे. कारण हे लोक तुम्हाला कधी धोका देतील याचा काही नेम नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.

शस्त्र असलेली व्यक्ती – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे शस्त्र आहे, अशी व्यक्ती ही तुमच्या कितीही जवळची असू द्या, पण अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. कारण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. तुम्ही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून बेसावध राहिलात आणि एखाद्या दिवशी अशा व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे तुमचा राग आला तर अशी व्यक्ती त्याच्या हातातील शस्त्राने तुमच्यावर वार करू शकते. यामध्ये तुमचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

महत्वाकांक्षी महिला – चाणक्य म्हणतात जी महिला ही अतिमहत्वाकांक्षी असते, अशा महिलेवर देखील कधीच विश्वास ठेवू नका. कारण या ठिकाणी तुम्हाला धोका मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. जर तुमची फसवणूक झाली तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे अशा महिलांपासून सावध राहिलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

राजा – चाणक्य म्हणतात राजा किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कधीही डोळे झाकून विश्वास करू नका. जर समजा तुम्ही राजावर डोळे झाकून विश्वास केला आणि समजा एखाद्या दिवशी त्याची मर्जी बिघडली तर तो तुम्हाला मृत्यूदंडाची देखील शिक्षा देऊ शकतो, त्यामुळे राजापासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत