Chanakya Niti : कामात यश मिळत नाहीये? मग चाणक्यांचा हा सल्ला ऐकाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण एखादं काम करतो, मात्र त्यामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही, त्यामुळे आपली निराशा होते, अशावेळी काय करायचं? हे चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे.

आर्य चाणक्य हे त्याकाळातील एक महान विचारवंत होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आजच्या काळात देखील अनेकांना प्रेरणा मिळते, अनेकदा आपल्यासोबत असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो, मात्र एखाद्या कामात आपल्याला अपयश येतं, जर आपल्याला वारंवार अपयश आलं तर आपण खचून जातो, आणि ते काम आपण अर्धवट सोडतो, त्यामुळे आपलं मोठं नुकसान होतं. चाणक्य म्हणतात तुम्ही जे काम करणार आहात, ते कधीही अर्धवट सोडू नका, तुम्हाला अपेक्षित यश त्या कामात का मिळत नाही याचा विचार करा? संयम, चिकाटी आणि जिद्द ठेवा, एक दिवस तुम्हाला नक्कीच त्या कामात यश मिळेल, तुम्ही जे काम करणार आहात, त्या कामात यश मिळण्यासाठी चाणक्य यांनी काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
काम सुरू करण्यापूर्वी हे तीन प्रश्न स्वत:ला विचारा – चाणक्य म्हणतात कुठलंही काम सुरू कण्यापूर्वी मी हे काम का सुरू करत आहे? या कामाचा परिणाम काय होणार आहे? आणि मला या कामात अपेक्षित यश मिळणार आहे का? हे तीन प्रश्न स्वत:ला विचारा, जर तुम्हाला या तीन प्रश्नांची उत्तर मिळाली तरच काम पुढे सुरू करा, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
शिक्षण आणि ज्ञान – चाणक्य म्हणतात कोणतंही काम सुरू करायचं असेल तर शिक्षण आणि ज्ञान हेच खरं भांडवल असतं. तुम्हाला जर त्या क्षेत्रातील ज्ञान असेल, तुम्ही त्या क्षेत्रातील शिक्षण घेतलं असेल तरच ते काम सुरू करा. कारण तुम्हाला जर त्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असेल तर काम सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला 50 टक्के यश मिळालेलं असतं.
योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं काम सुरू करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी काही योजना आखतात, अशा योजना नेहमी गुप्त ठेवाव्यात कारण अशा योजना जर तुमच्या स्पर्धकांना माहीत झाल्या तर एकतर ते या योजनांचा उपयोग करतील किंवा आपल्या योजना अपयशी ठरव्यात यासाठी ते प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे जोपर्यंत आपल्याला कामात यश मिळत नाही, तोपर्यंत आपल्या सर्व योजना या गुप्त ठेवा
आत्मविश्वास – चाणक्य म्हणता कोणतंही काम असू द्या, ते पूर्ण आत्मविश्वासानं करा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्यात आत्मविश्वास आहे, तोपर्यंत तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
