AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी येतात, त्याच्यापासून त्याने नेहमी दूरच राहिलं पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 6:58 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचा राजा धनानंदच्या दरबारामध्ये अपमान झाला होता, त्यानंतर चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्या मदतीने धनानंदाची बलाढ्य राजवट उलथून आपल्या अपमानाचा बदला घेतला. माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या आयुष्यात अनेक चुका करतो, त्यातून तो शिकतो. परंतु अशा काही चुका आहेत, ज्या केल्यानंतर माणसाला त्यातून सावरण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, त्यापासून माणसाने नेहमी दूरच रहावं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कर्ज – चाणक्य म्हणतात माणसाने गरज असेल तरच कर्ज घ्यावं, जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला तर तुमची चिंता देखील वाढते. चिंता वाढल्यामुळे आयुष्य जगणं कठीण होतं. त्यामुळे माणसाने नेहमी अंथरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ तुम्हाला घालता आला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

प्रिय व्यक्तींकडून होणारा अपमान – चाणक्य म्हणतात माणसाला जी व्यक्ती सगळ्यात प्रिय असते, अशा व्यक्तीकडून झालेला अपमान तो कधीही सहन करत नाही, त्यामुळे आपलं वर्तन नेहमी असंच असावं, ज्यामुळे आपल्या जवळचे व्यक्ती दुखावले जाणार नाहीत.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात माणसाची संगत कशी आहे, यावरून त्याची भविष्याची दिशा ठरत असते. एक चुकीचं संगत तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे माणसाने नेहमी चांगल्या माणसांची संगत ठेवावी. चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये जीवनाचं सार्थक होतं.

आर्थिक अडचण – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जर वारंवार आर्थिक अडचण येत असेल तर त्यामुळे त्याची चिंता वाढते. त्यामुळे माणसाने उपभोगाच्या वस्तूंसाठी कमी खर्च केला पाहिजे. आपल्या गरजा काय आहेत? हे आधी ओळखलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप