AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय मग विद्यार्थ्यांकडे हे गुण हवेच, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी काही मुलभूत सवयी असाव्या लागतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : यशस्वी व्हायचंय मग विद्यार्थ्यांकडे हे गुण हवेच, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 10:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं?  याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तुम्हाला जर जगण्यासाठी सर्वात जास्त कशाची गरज असते ती म्हणजे ज्ञान. तुम्ही तुमच्या विद्यार्थी दशेत जेवढी मेहनत घेतात, जेवढं ज्ञान संपादन करतात तेवढं त्यानंतरचं आयुष्य तुम्ही आरामात जगतात. त्यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये मानसाने कधीही आळस करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात जर विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल, परीक्षेत चांगलं यश प्राप्त करायचं असेल तर त्यांच्याकडे काही महत्त्वाचे गुण असणं गरजेचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

ज्ञान मिळवण्याची इच्छा – चाणक्य म्हणता ज्ञान मिळवणं हेच विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची इच्छा पाहिजे, नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची तयारी पाहिजे. जर विद्यार्थ्याची ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल, अभ्यास करण्याची इच्छा असेल तर तो यशस्वी होणार. अभ्यास केलाच नाही तर त्याला कधीही यश मिळू शकत नाही.

एकाग्रता – चाणक्य म्हणतात विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, याकडे त्याचं लक्ष असलं नाही पाहिजे, जर त्याच्याकडे एकाग्रता असेल तर तो नक्कीच यशस्वी होईल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

जिज्ञासू वृत्ती – चाणक्य म्हणतात विद्यार्थांकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत आणि शिक्षकांनी देखील त्यांच्या उत्तरांचं समाधान केलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत