Chanakya Niti : असे लोक असतात फारच धोकादायक, नेहमी राहा सावध
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की काही लोक हे खूपच धोकादायक असतात, अशा लोकांपासून कायम सावध असलं पाहिजे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या समाजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. जे लोक हे मोकळ्या स्वभावाचे असतात, सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतात, अशा व्यक्तींपासून तुम्हाला कोणताही धोका नसतो, अशा लोकांशी तुम्ही मैत्री करू शकता, कारण या लोकांच्या मनात जे असतं, तेच त्यांच्या बोलण्यामध्ये देखील असतं. मात्र समाजात असे देखील लोक असतात ज्यांच्यापासून तुम्हाला कायम सावध राहण्याची गरज असते. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
अशा लोकांपासून कायम सावध राहा
आर्य चाणक्य म्हणतात की जे लोक नेहमी शांत असतात, कोणाशी फार काही बोलत नाहीत, अशा लोकांपासून कायम सावध राहिलं पाहिजे, अशा लोकांशी मैत्री करावी, मात्र मैत्री करताना देखील सावध असं पाहिजे, कारण असे लोक हे फारच धोकादायक असतात. कारण हे लोक यांच्या मनात जे विचार चालू आहेत, ते कधीही आपल्या बोलण्यातून व्यक्त होऊ देत नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या मनाचा आपल्याला कधीही अंदाज येत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य पुढे म्हणतात जे लोक नेहमी शांत असतात, फार काही बोलत नाहीत, अशा लोकांचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे असे लोक नेहमी आपल्या योजना गुप्त ठेवण्यात यशस्वी होतात. त्यांच्या योजना आपल्याला कधीही कळू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून आपण नेहमी सावध असलं पाहिजे त्यातच आपलं हित आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
