AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाचे आयुष्यात तीन सर्वात मोठे शत्रू असतात. हे असे शत्रू असतात, जे माणसाचं आयुष्य हळुहळु संपून टाकतात आणि ते त्याच्या लक्षातही येत नाही.

Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत, त्या हळुहळु माणसाचं आयुष्य संपवतात आणि ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे माणसानं अशा स्थितीमध्ये नेहमी सावध असलं पाहिजे. चाणक्य पुढे असंही म्हणतात जे आपले थेट शत्रू असतात, ते आपल्याला माहीत असतात, ते आपलं नुकसानच करणार आहेत, हे आपण गृहित धरलेलं असतं, त्यामुळे आपण कायम अशा व्यक्तींपासून सावध राहतो. मात्र गुप्त शत्रू हे त्यांच्यापेक्षाही खरतनाक असतात, हे कधी समोरच येतच नाहीत, त्यामुळे तुमचं आयुष्यात मोठं नुकसान होऊ शकतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात स्वार्थी मित्र कधीही ठेवू नये, कारण असे लोक तुमच्याशी फक्त स्वार्थासाठी मैत्री करतात. एकदा त्यांचा स्वार्थ साधला की ते तुमची साथ सोडून निघून जातात. असे लोक त्यांच्या स्वार्थासाठी तुमची फसवणूक करण्यासाठी देखील मागे पुढे पहात नाही. अशा लोकांमुळे तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

कर्ज – चाणक्य म्हणतात कर्ज देखील माणसाचा असा शत्रू आहे, जो हळुहळु माणसाला संपवून टाकतो. तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकत जातात, आणि तुम्ही कधी अडकला हे देखील तुम्हाला कळत नाही, त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर रहावं.

आजारपण – चाणक्य म्हणतात आजार पण हे देखील माणसाचा मोठा शत्रू आहे. जर तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर आजारावर उपचार करून त्याला समूळ नष्ट करणं गरजेचं असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!