Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग कोंबड्यापासून शिका हे गुण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य यांच्या मते निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही न काही शिकवत असते. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, आणि याच दुर्लक्षामुळे एक दिवस आपण मोठ्या संकटात सापडतो. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, कुटनीतीतज्ज्ञ होते. त्या काळात त्यांचा सल्ला घेण्यासाठी देशभरातून लोक येत असत. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या काही नीती सांगितल्या आहेत, त्या नीती आजच्या काळातही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही न काही शिकवत असते, मात्र ते आपल्याला अनेकदा कळत नाही. जसं की झाड आपल्याला परोपकार शिकवतं, आपण उन्हातून आल्यानंतर झाडाच्या थंडगार छायेत बसतो, आपल्याला बरं वाटतं, मात्र त्यानंतर आपण त्याच झाडाला दगड मारून त्याचं फळ खाली पाडतो, आपण झाडाला दगड मारतो, मात्र त्याबदल्यात झाड आपल्याला फळ देतं. हाच गुण झाडाकडून आपणं शिकला पाहिजे असं चाणक्य म्हणतात. चाणक्य पुढे म्हणतात जसं तुम्हाला झाड काही गोष्टी शिकवत, तशाच काही गोष्टी तुम्ही कोंबड्यापासून सुद्धा शिकल्या पाहिजेत, त्यामुळे तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते.
सकाळी लवकर उठणे – चाणक्य म्हणतात कोंबडा हा नेहमी सकाळी लवकर उठतो, तो आपल्या या कामात एक दिवसाचाही कंटाळा करत नाही, कोंबड्यापासून आपण हाच गुण घेतला पाहिजे, रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, जे लोक उशिर उठतात असे लोक कायम आजारी असतात, आजारपणात प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होतो, त्यामुळे माणसांनं नेहमी सकाळी उठावं, जे लोक सकाळी उठतात ते कायम निरोगी राहतात.
आळस – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, तुम्ही कधी कोंबड्याला आळस करताना पाहायलं आहे का? तर नाही तो भल्या पहाटे उठतो आणि त्याचं दैनंदिन जे काम आहे, धान्य गोळा करण्याचं ते खाण्याचं ते काम तो सुरू करतो, त्यामुळे आयुष्यात कधीही आळस करू नका.
वाटून खा – चाणक्य म्हणतात कोंबडा गोळा केलेलं धान्य आपल्या कुटुंबासोबत वाटून खातो, त्याचप्रमाणे तुम्ही ज्या काही वस्तू खरेदी करता त्या आपल्या कुटुंबासोबत शेअर करा, त्यामुळे प्रेम वाढले, तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
