Chanakya Niti : दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी माणसाच्या आयुष्यावर तो जे अन्न खातो, त्याचा परिणाम कसा होतो? याबद्दल आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, तसेच इतरांच्या घरी अन्न न खाण्याच्या सल्ला देखील दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 02, 2026 | 8:34 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मार्गदर्शक ठरतात. आपण जे अन्न खात असतो, त्या अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र दुसरीकडे त्याचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या स्वरुपात परिणाम देखील होत असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दुसऱ्याच्या घरचं अन्न का खाऊ नये? हे सांगताना चाणक्य म्हणतात त्यामागे वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि काही धार्मिक कारणं आहेत. हे सांगताना चाणक्य एक उदाहरण देतात, चाणक्य म्हणतात समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवण्यासाठी गेला आहात आणि तुमचं जेवण तयार करणारी व्यक्ती ही रागात, दु:खात किंवा एखाद्या नकारात्मक विचारात असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर देखील होतो.ती नकरात्मकता तुमच्यामध्ये देखील जाणून लागते, त्यामुळे इतरांच्या घरी कधी अन्न खाऊ नये असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नकारात्मकता – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्याच्या घरी जेवणासाठी गेला आहात आणि समोरची व्यक्ती जर नकारात्मक विचारात असेल किंवा रागात असेल अशा व्यक्तीने जर तुमचं जेवण बनवलं तर ते नकारात्मक विचार तुमच्यामध्ये देखील येतात. त्यामुळे शक्यतो दुसऱ्याच्या घरी कधीही जेवणं करणं टाळावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

संस्काराचा प्रभाव – चाणक्य म्हणतात आपण जर एखाद्याच्या घरी जेवलो तर त्या घरावर असलेल्या संस्काराचा प्रभाव देखील आपल्यावर पडतो. जर घरावर चांगले संस्कार असतील तर मग समस्या नसते, मात्र जर एखाद्या व्यक्तीवर चांगले संस्कार झालेलेच नसतील तर मग तसाच प्रभाव हा तुमच्यावर देखील पडतो.

पापाचे भागीदार – गरुड पुरानुसार ज्या लोकांनी अनैतिक मार्गाने किंवा इतरांची फसवणूक करून धन कमावलं आहे, आणि अशा लोकांनी जेवणासाठी तुम्हाला बोलावलं, त्यांनी जेवणासाठी पाची पक्वान्न जरी केलं तरी अशा घरी कधीही जाऊ नका. कारण तुम्ही जर अशा लोकांच्या घरी जेवलात तर त्यांच्या पापात तुम्ही देखील भागीदार होतात, त्यामुळे अशा घरी जेवू नये.

अस्वच्छाता – चाणक्य म्हणतात तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जेवणासाठी गेलात मात्र तिथे जर अस्वच्छता असेल तर अशा ठिकाणी जेवल्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकतात. त्यामुळे शक्यतो बाहेर जेवणं करणं टाळावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us