Chanakya Niti : लग्नापूर्वी या चार गोष्टींचा आवश्य विचार करा, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात लग्न ही एक फार मोठी जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात, त्यापूर्वी अशा काही गोष्टी असतात, ज्यांचा विचार करणं गरजेचं असतं.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात लग्न ही एक फार मोठी जबाबदारी असते, जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा तुम्ही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर या गोष्टींचं उत्तर सकारात्मक आलं तरच तुम्ही लग्न करण्याच्या निर्णय घ्या, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, काही लोक कोणताही विचार न करता लग्नाचा निर्णय घेतात, परंतु अशी लग्न फार काळ टिकत नाहीत, पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होतात, परिणामी याचा परिणाम हा दोन्ही कुटुंबावर होतो, घर अशांत होतं. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी चार गोष्टी तपासल्याच पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटल आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? आणि त्या चार गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.
आर्थिक स्थिती – चाणक्य म्हणतात लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी असते. जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुमच्यावर तुमच्या पत्नीची जबाबदारी येते. कालांतराने मुलांची देखील जबाबदारी येते. आर्थिकदृष्ट्या आपण त्यांची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहोत का? याचा प्रत्येकाने विचार करावा. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर तुम्ही लग्नाचा विचार करू शकता, आणि जर तुम्ही आर्थिक दृष्या सक्षम नसाल तर आधी तुम्ही स्वत:ला त्या योग्यतेचं बनवा आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घ्या, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जोडीदाराकडून अपेक्षा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही लग्नासाठी जोडीदाराची निवड करता, तेव्हा तो किंवा ती सुंदर आहे फक्त या एकाच निकषावर निवड करू नका. तर सर्वात आधी तुमच्या जोडीदाराचा स्वभाव तपासून बघा. जर तुमचा जोडीदार हा सर्वांचा आदर करणारा असेल, त्याची निर्णय क्षमता चांगली असेल. जर तुम्हाला खात्री पटली असेल की आपण त्याच्यासोबत आयुष्यभर सुखाचा संसार करू शकतो, तर आणि तरच त्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करा.
समानता – चाणक्य म्हणतात आपली आर्थिक स्थिती जशी आहे, तशाच जोडीदाराची देखील निवड करावी, जर तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि तुम्ही गरीब जोडीदार निवडला किंवा तुम्ही गरीब आहात आणि तुम्ही खूप श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केलं तर असं नातं फार काळ टिकत नाही.
स्वार्थी – चाणक्य म्हणतात जोडीदार हा कधीही स्वार्थी नसावा, जर तुमचा जोडीदार हा स्वार्थी असेल तर तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)