नवरा-बायकोंनी काय करावं? कुणीच सांगणार नाही या चार गोष्टी; पण एकाच व्यक्तीने…
चाणक्य नीतीनुसार आनंदी वैवाहिक जीवनासाठी चार महत्त्वाचे घटक आहेत. ते म्हणजे स्पर्धा टाळणे, गोपनीयता राखणे, एकमेकांच्या गरजा समजून घेणे आणि संयम बाळगणे. पती-पत्नी एकमेकांचे मित्र असावेत, नव्हे स्पर्धक नाही. गोपनीयता राखणे आणि एकमेकांच्या भावनांना आदर देणे हेही महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संयम बाळगणे आवश्यक आहे. हे चार तत्वे पाळल्यास सुदृढ आणि आनंदी वैवाहिक जीवन शक्य आहे.

आर्य चाणक्यांनी आयुष्यातील प्रत्येक पैलूवर सखोल विचार मांडले आहेत. आर्य चाणक्यांनी त्यांच्या जीवनानुभवातून व्यवसाय, मित्रता, वैवाहिक जीवन, संपत्ती, शिक्षण आणि व्यापार यांसारख्या सर्व विषयांवर चिंतन केलं आहे. नवरा-बायको एकमेकांना पूरक असतात. वैवाहिक जीवन साधे आणि प्रेमळ बनवायचे असल्यास, दोन्हीकडून प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे चाणक्य सांगतात. परस्पर सौहार्द आणि प्रेमावर आधारित नातं कायमचे दृढ असतं. चाणक्य नीतिशास्त्रानुसार सुखी वैवाहिक जीवनासाठी चार महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत.
चाणक्यांनी वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. नातं कसं टिकवलं पाहिजे, सुखी संसार करायचा असेल तर नवरा आणि बायको या दोघांनीही कोणत्या मर्यादा पाळल्या पाहिजे. एकमेकांना आयुष्यभर कशी साथ दिली पाहिजे यावरही चाणक्यांनी प्रकाश टाकलेला आहे.
स्पर्धा नसावी
वैवाहिक नात्यात पती-पत्नी एकमेकांचे मित्र असले पाहिजेत, त्यांनी एकमेकांचे स्पर्धक बनू नये. सुखी वैवाहिक जीवनासाठी, नवरा-बायकोंनी एकत्र चालावं. एकमेकांना जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात साथ द्यावी. चुका काढण्याऐवजी मार्ग शोधावेत. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांचे स्पर्धक बनू नये.
गोपनीयता राखा
प्रत्येक नात्याला काही मर्यादा असतात. नवरा-बायको दरम्यान काही गोष्टी खास आणि गुप्त असाव्यात. त्या इतरांना कधीच सांगता येत नाहीत. त्यांच्या गुप्त गोष्टी दुसऱ्या कोणाला सांगितल्यास त्यांच्या नात्यात तणाव आणि फट निर्माण होऊ शकते. म्हणूनच, पती-पत्नींनी या गोष्टीकडे अधिक लक्ष द्यायला हवं, असे चाणक्य सांगतात.
गरजा ओळखा
नवरा-बायकोने एकमेकांच्या गरजा समजून घ्याव्यात. सुखी वैवाहिक जीवनासाठी, एकमेकांच्या भावनांना आदर देणे आणि एकमेकांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. एकमेकांच्या गरजा एकमेकांना शेअर केल्याने, नातं अधिक घट्टा होील. याउलट, या गोष्टीचा अभाव असेल, तर नात्यात फूट पडू शकते.
संयम असावा
तुमचं वैवाहिक जीवन यशस्वी करायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सहनशीलता ठेवावी लागेल. कारण कधी कधी प्रतिकूल परिस्थितीमुळे नात्यात ताण आणि तडजोड येऊ शकते. म्हणूनच, कोणतीही समस्या उद्भवल्यास, सहनशीलता ठेवून त्यावर उपाय शोधावा लागतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
