Chandra Darshan 2022 | आजचे ‘चंद्र दर्शन’ देईल वैभव, पैसा आणि सर्वकाही, जाणून घ्या महत्त्व

Chandra Darshan 2022 | आजचे 'चंद्र दर्शन' देईल वैभव, पैसा आणि सर्वकाही, जाणून घ्या महत्त्व
moon

अमावस्येनंतर चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. ज्या व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या, तणाव आणि गरिबीचा त्रास होत असेल तर त्यांनी अमावस्येचे व्रत ठेवावे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 04, 2022 | 6:30 AM

मुंबई :  भारतीय प्राचीन परंपरेत चंद्र दर्शनाला खूप महत्त्व प्राप्त आहे. पुराणात शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीला चंद्र दर्शनाला खास महत्त्व आहे. अमावस्येनंतर चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. ज्या व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या, तणाव आणि गरिबीचा त्रास होत असेल तर त्यांनी अमावस्येचे व्रत ठेवावे. यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्र पाहूनच भोजन करावे. यामुळे व्यक्तीचे प्रश्न सुटतात.

तारीख आणि शुभ वेळ
चंद्र दर्शनाची तारीख: 04 जानेवारी, दिवस – मंगळवार
चंद्रोदय: 04 जानेवारी, सकाळी 08:47 वाजता, दर्शन – संध्याकाळी 5:15 नंतर
चंद्रास्त : 4 जानेवारी, 07:20 वा.

चंद्रदर्शनाचे महत्त्व
हिंदू धर्मानुसार चंद्राला देवता मानले जाते. इतकेच नाही तर सर्व नऊ ग्रहांमध्ये चंद्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. चंद्राचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. अशा स्थितीत अनेक लोकांमध्ये चंद्राची पूजा करण्याचा विधीही केला जातो. असे मानले जाते की चंद्राची पूजा आणि व्रत पाळल्याने जीवनातील सर्व नकारात्मक विचार दूर होतात होतात.

पितरांचाही आशीर्वाद मिळतो
या दिवशी उपवास करताना चंद्राच्या शक्तिशाली मंत्रांचा जप केला जातो, ज्यामुळे चांगले परिणाम मिळण्यास मदत होते. चंद्र हा मानवी मनाचा मानक मानला जातो.चंद्रदर्शनाच्या दिवशी भक्त त्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. चंद्रदर्शनाच्या दिवशी लोक आपल्या पूर्वजांची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.

चंद्र दर्शनाची उपासना पद्धत
संध्याकाळी विधिवत चंद्राची पूजा करा .
चंद्रदेवाला रोळी, फळे आणि फुले अर्पण करा.
चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास उघडा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंंधित बातम्या : 

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें