Chandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात?

2021 चे पहिले चंद्रग्रहण लवकरच लागणार आहे (Chandra Grahan 2021 ). परंतु काहीच लोकांना माहितीये की हे ग्रहण इतर ग्रहणांसारखे नाही. यावर्षी या ग्रहणाचे महत्त्व वेगळे आहे.

Chandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात?
Lunar-eclipse

मुंबई : 2021 चे पहिले चंद्रग्रहण लवकरच लागणार आहे (Chandra Grahan 2021 ). परंतु काहीच लोकांना माहितीये की हे ग्रहण इतर ग्रहणांसारखे नाही. यावर्षी या ग्रहणाचे महत्त्व वेगळे आहे. कारण यावेळी ‘सुपरमून’, ‘रेड ब्लड मून’ आणि चंद्रग्रहण अशा तीन चंग्र घटना एकाच वेळी घडतील. 26 मे रोजी प्रथम पूर्ण चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, पूर्व महासागर आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल. भारतीयांसाठी, चंद्र पूर्व क्षितिजाच्या खाली असेल, ज्यामुळे भारतातील लोक ब्लड मून पाहू शकणार नाहीत (Chandra Grahan 2021 Know Why This Lunar Eclipse Called As Super Blood Moon).

मे महिन्यात होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाला फ्लावर मून देखील म्हणतात, कारण हे उत्तरी गोलार्धात वसंत ऋतूदरम्यान होतो.

सुपर मून म्हणजे काय?

पृथ्वीभोवती चंद्राची कक्षा पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणूनच जसेजसे पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, तसेतसे दोघांदरम्यानचे अंतर बदलत असते. कक्षांमधील सर्वात जवळील बिंदूला पेरिगी असे म्हणतात जे पृथ्वीपासून सुमारे 28,000 मैलांवर आहे. म्हणून जेव्हा पौर्णिमा पेरिगीच्या जवळ असते तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. कारण, त्यावेळी पूर्ण चंद्र सामान्य पौर्णिमेपेक्षा 30 टक्के मोठा आणि 14 टक्के अधिक चमकदार दिसतो.

रेड ब्लड मून म्हणजे काय?

जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने व्यापलेला असतो, तेव्हा ब्लड मून असतो. परंतु काळा होण्याऐवजी तो लाल रंगाचा होतो. हेच एकमेव कारण आहे की पूर्ण चंद्रग्रहणाला कधीकधी ‘रेड ब्लड मून’ असे म्हणतात.

नासाने म्हटले की, “ग्रहण लागलेला चंद्र त्यावेळी जगभरात होणाऱ्या सर्व सूर्यास्त आणि सूर्योदयांचा शिल्लक लाल-नारंगी प्रकाशामुळे मंदपणे प्रकाशित होतो. ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या वातावरणात जितकी अधिक धूळ किंवा ढग असतील, चंद्र तितकाच जास्त लाल दिसेल.”

सुपर ब्लड मूनचा वेळ काय?

26 मे रोजी, सुपर मून संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास असेल, जेव्हा पौर्णिमा पेरीगीवर असेल. पृथ्वी आणि सुपर मून मधील अंतर 3,57,309 किमी असेल. ज्यांना हे विलक्षण चंद्रग्रहण पहायचं असेल, ते दुर्बिणीद्वारे ते पाहू शकतात.

Chandra Grahan 2021 Know Why This Lunar Eclipse Called As Super Blood Moon

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI