Chandra Grahan 2025: वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणात या 3 राशींना बसणार धक्का, ठरणार धोक्याची घंटा
ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीला होणार आहे. या चंद्रग्रहणाचा तीन राशीच्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होईल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी लागेल. चला जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत.

Chandra Grahan 2025 Negative Effects: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहणाची संक्रमण आणि ग्रहण या घटना खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते. ग्रहांचे जेव्हा परिवर्तन होते तेव्हा सर्व राशींच्या लोकांवर त्यांचे परिणाम होत असतात. तर यावेळी नवीन वर्षांच्या सुरुवातीला चंद्रग्रहण असणार आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र ग्रहण असते तेव्हा त्यांचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवरही पडतो. यंदा 2025 सालचे पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्रग्रहण आहे तेव्हा चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार…
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि शनि चंद्रापासून सातव्या घरात असणार आहे. हे दोन्ही ग्रह त्यांच्या सातव्या दृष्टिने चंद्र पाहतील. या चंद्रग्रहणाचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या आणि काही राशींच्या जीवनावर खोलवर परिणाम होईल. अशा परिस्थितीत, या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींच्या जीवनावर परिणाम होईल ते जाणून घेऊया. या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी खास करून काळजी घ्यावी लागेल. हे देखील जंतून घेऊयात…
वर्षातील पहिले चंद्रग्रहण कधी आहे?
2025 सालचे पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी आहे. 14 मार्च रोजी सकाळी 9:29 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. ते दुपारी 3:29 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सुतक काळ वैध राहणार नाही. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार, 14 मार्च रोजी लागणारं चंद्रग्रहण काही राशींसाठी अशुभ असण्याची शक्यता आहे. या काळात त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सिंह रास
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील पहिले चंद्रग्रहण सिंह राशीच्या जीवनावर ओढावणार आहे. अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त परिणाम सिंह राशीच्या लोकांना होईल. या काळात सिंह राशीच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे ताण बराच वाढू शकतो. कुटुंबात वाद आणि मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात सिंह राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाची पूजा करणे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरेल.
मिथुन रास
चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम मिथुन रास असणाऱ्या लोकांना सुद्धा होणार आहे. यावेळी मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. जीवनातील सुखसोयींमध्ये घट होऊ शकते. तसेच घरात कलहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मिथुन रास असलेल्या लोकांना खूप मानसिक ताण येऊ शकतो. तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. या काळात मिथुन राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करावी. त्यांना दुर्वा अर्पण करणे फायद्याचे ठरेल.
तुला रास
चंद्रग्रहणाच्या काळात तूळ राशीच्या लोकांचा आर्थिक खर्च वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यात अडथळे येऊ शकतात. या काळात तूळ राशीच्या लोकांनी हनुमान चालीसाचे पठण करावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
