तुळजाभवानी माता मंदिराच्या वेळेत बदल, इतक्या वाजता उघडणार मंदिर

शाळांनाही सुट्ट्या असल्याने कुटूंबासह बाहेर फिरायला जाण्याकडे अनेकांचा कल आहे. या काळात अनेक जण देवदर्शनलाही जातात. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भक्तांची मोठी गर्दी होत आहे. या अनुशंगाने मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. तुळजाभवानी मातेचे मंदीर येत्या 3 दिवस 21 नोव्हेंबर पर्यंत वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तुळजाभवानी माता मंदिराच्या वेळेत बदल, इतक्या वाजता उघडणार मंदिर
तुळजाभवानी
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 1:55 PM

तुळजापूर : महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या (Tulja Bhawani Mandir) वेळेत बदल करण्यात आला आहे. दिवाळी आणि डिसेंबर महिन्यात अनेक सुट्ट्या या लागून आल्या आहेत. शाळांनाही सुट्ट्या असल्याने कुटूंबासह बाहेर फिरायला जाण्याकडे अनेकांचा कल आहे. या काळात अनेक जण देवदर्शनलाही जातात. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भक्तांची मोठी गर्दी होत आहे. या अनुशंगाने मंदिर प्रशासनाने दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. तुळजाभवानी मातेचे मंदीर येत्या 3 दिवस 21 नोव्हेंबर पर्यंत पहाटे 1 वाजता उघडले जाणार असुन 31 डिसेंबर पर्यंत मंगळवारी, शुक्रवारी,रविवारी व पौर्णिमा दिवशी सुद्धा मंदीर पहाटे 1 वाजता उघडले जाणार आहे.

अभिषेक काळात सशुल्क दर्शन बंद

महाराष्ट्राच्या सिमेजवळ असलेल्या तुळजापूच्या तुळजा भवानी मंदिरात संपूर्ण देशातून भक्त दर्शनासाठी येतात. या काळात मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. मंदिर प्रशासनाकडून सशुल्क दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना शक्य आहे ते भाविक या सुविधेचा लाभ घेतात. याशिवाय निशुल्क दर्शनासाठी मोठी रांग असते. बऱ्याचदा सशुल्क दर्शन रांगेमुळे सर्वसामान्यांना तात्कळत राहावे लागते. ही बाब लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दररोज सकाळी 6 ते 10 आणि सकाळी 7 ते 9 या अभिषेकाच्या वेळेस सशुल्क दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी सुट्ट्या आणि लग्न सराईची गर्दी पाहाता हा निर्णय भक्तांसाठी काहिसा दिलासादायक ठरणार आहे. याशिवाय 22 तास दर्शन सुरू राहाणार असल्याने जास्तीत जास्त भक्तांना देवीचे घेता येणे शक्य होईल.

हे सुद्धा वाचा

तुळजाभवानीबद्दलची आख्यायीका

कर्दम ऋषींची तपस्वी पत्नी अनुभूती हिने कृतयुगात कठोर तपश्चर्या केली होती. तथापि, कुकुर नावाचा राक्षस त्याच्या तपश्चर्येला अडथळा आणण्यासाठी प्रकट झाला आणि तपस्वी भावनांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी, तपस्वी अनुभूतीने देवी भगवतीची प्रार्थना केली आणि तिला राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली.

त्यांची प्रार्थना आणि विनंती ऐकून देवी भगवती प्रकट झाली आणि देवी आणि राक्षस यांच्यात युद्ध झाले आणि देवीने राक्षसाचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि त्यांचे म्हणणे ऐकून देवीने होकार दिला. जेव्हा जेव्हा शुद्ध अंतःकरणाने भक्त देवीकडे मदतीसाठी विचारतो तेव्हा देवी प्रकट होते आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. त्यामुळे तिला टेकता-तुर्जा-तुळजा भवानी देवी म्हणूनही ओळखले जाते.

बालाघाट सीमेवर देवी नावाच्या समाजात देवी आहे. या मंदिराचा काही भाग हेमाडपंथी शैलीत बांधलेला आहे. हे मंदिर राष्ट्रकूट आणि यादव वंशाच्या काळात बांधले गेले. काहींच्या मते हे मंदिर 17व्या किंवा 18व्या शतकात बांधले गेले होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.