AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Datta Jayanti 2021 | जाणून घ्या दत्त जयंती केव्हा आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि कथा!

मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती 18 डिसेंबरला शनिवारी येत आहे. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले होते.

Datta Jayanti 2021 | जाणून घ्या दत्त जयंती केव्हा आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि कथा!
दत्त जयंती
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 8:24 AM
Share

मुंबई : मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती 18 डिसेंबरला शनिवारी येत आहे. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले होते. दत्तात्रेयांच्या नावाने दत्त पंथाचा उदय झाला. संपूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व असले तरी दक्षिण भारतात त्याचे महत्त्व अधिक आहे. कारण तेथे अनेक लोक दत्त संप्रदायाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव मिळते.

शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथीची सुरुवात: 18 डिसेंबर, शनिवार सकाळी 07.24 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त: 19 डिसेंबर, रविवारी सकाळी 10.05 वाजता समाप्त होईल.

दत्तात्रेय कथा

एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीन देव महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनसूया हिच्या सद्गुणधर्माची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर आले. तिन्ही देव वेशात अत्रि मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी माता अनसूयासमोर अन्नाची इच्छा व्यक्त केली. तिन्ही देवांनी त्यांना नग्नावस्थेतच जेवू घालण्याची अट घातली. यावर आई गोंधळून गेली.

त्याने ध्यान करून पाहिले तर समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूच्या रूपात उभे असलेले दिसले. माता अनसूयाने अत्रि मुनींच्या कमंडलातून पाणी काढून तिन्ही साधूंवर शिंपडले. यानंतर तिन्ही ऋषी बाळ झाले. नंतर मातेने देवांना भोजन दिले.

त्याने तिने ध्यान करून पाहिले तर समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूच्या रूपात उभे असलेले दिसले. माता अनसूयाने अत्रि मुनींच्या कमंडलातून पाणी काढून तिन्ही साधूंवर शिंपडले. यानंतर तिन्ही ऋषी बाळात रुपांतरीत झाले. नंतर मातेने देवांना भोजन दिले.

जेव्हा तिन्ही देव बाळ झाले, तेव्हा तिन्ही देवी पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी पृथ्वीवर पोहोचल्या आणि त्यांनी माता अनसूयाकडे क्षमा मागितली. तिन्ही देवांनीही आपली चूक मान्य करून मातेच्या पोटातून जन्म घेण्याची विनंती केली. यानंतर तिन्ही देवांनी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला. अशी कथा पुराणात आपल्याला ऐकायला मिळते.

संबंधित बातम्या : 

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ