Datta Jayanti 2021 | निराकार गुरु गुरु रे निर्गुण , जाणून घ्या दत्त जयंतीचा महिमा , शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या वेळी दत्त जयंती 18 डिसेंबरला शनिवारी येत आहे.

Datta Jayanti 2021 | निराकार गुरु गुरु रे निर्गुण , जाणून घ्या दत्त जयंतीचा महिमा , शुभ मुहूर्त
datta jayanti
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 8:35 AM

मुंबई : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याना खूप पवित्र मानला जातो. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या वेळी दत्त जयंती 18 डिसेंबरला शनिवारी येत आहे. दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. दत्ताच्या नावाने दत्त पंथाचा उदय झाला. पूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व असले तरी दक्षिण भारतात या जयंतीचे अधिक महत्त्व आहे. भगवान दत्ताची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव प्राप्त होते अशी मान्यता आहे.जर संकट समयी तुम्ही दत्ताचा धावा केला तर दत्त तुमच्या मदतील नक्की धावून येतात अशी मान्याता आहे.

दत्त जयंतीची पूजा पद्धत दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. यानंतर पूजास्थान स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. यानंतर भगवान दत्ताची प्रतिमा स्थापन करा. यानंतर भगवान दत्तात्रेयांना धूप, दिवा, रोळी, अक्षत, फुले इत्यादी अर्पण करा.

शुभ वेळ पौर्णिमा तिथी सुरू होते: 18 डिसेंबर, शनिवार सकाळी 07.24 वाजता सुरू होते पौर्णिमा तिथी समाप्त होते: 19 डिसेंबर, रविवारी सकाळी 10.05 वाजता समाप्त होते

भगवान दत्ताची आख्यायिका एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनसूया हिच्या सद्गुणधर्माची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर आले. तिन्ही देव वेशात अत्रि मुनींच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांनी माता अनसूयासमोर अन्नाची इच्छा व्यक्त केली. तिन्ही देवांनी त्यांना नग्नावस्थेतच जेवू घालण्याची अट घातली. यावर अनसूया गोंधळून गेली.

त्याने तिने ध्यान करून पाहिले तर समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेश साधूच्या रूपात उभे असलेले दिसले. माता अनसूयाने अत्रि मुनींच्या कमंडलातून पाणी काढून तिन्ही साधूंवर शिंपडले. यानंतर तिन्ही ऋषी बाळात रुपांतरीत झाले. नंतर मातेने देवांना भोजन दिले. जेव्हा तिन्ही देव बाळ झाले, तेव्हा तिन्ही देवी (पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी) पृथ्वीवर पोहोचल्या आणि त्यांनी माता अनसूयाकडे क्षमा मागितली. तिन्ही देवांनीही आपली चूक मान्य करून मातेच्या पोटातून जन्म घेण्याची विनंती केली. यानंतर तिन्ही देवांनी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला. अशी कथा पुराणात आपल्याला ऐकायला मिळते.

संबंंधीत बातम्या :

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र

lucky charms | घरातून बाहेर गेल्यावर ‘या’ 4 गोष्टी पाहिल्यात तर तुमचं काम झालंच म्हणून समजा

Lord Vishnu Worship Method : संकटातून मुक्तता, मृत्यूनंतर मोक्ष हवा असेल तर भगवान विष्णूला ही फुल अर्पण करा

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.