Diwali 2023 : यंदा पाच नाही तर सहा दिवसांचा असणार दिपोत्सव, काय आहे कारण?

घरोघरी सध्या दिवाळीची तयारी सुरू आहे. दिवाळी निमीत्त्य अनेकांनी वेगवेगळे बेत आखलेले असतील. यंदाची दिवाळी ही दरवर्षीपेक्षा विशेष असणार आहे. दिवाळीत सहसा पाच दिवस असतात मात्र यंदा एक दिवस जास्त म्हणजे सहा दिवस दिवाळी साजरी होणार आहे.

Diwali 2023 : यंदा पाच नाही तर सहा दिवसांचा असणार दिपोत्सव, काय आहे कारण?
दिवाळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 11:37 AM

मुंबई : घरोघरी दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी सुरू आहे. नोकरी करणारे दिवाळी (Diwali 2023) निमीत्त आपआवल्या गावाला जातात. यंदाची दिवाळी काही कारणामुळे विशेष असणार आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. हा दिव्यांचा उत्सव 5 दिवस चालतो – धन तेरस, नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी, मोठी दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज. मात्र यंदा तारखांमध्ये वाढ झाल्यामुळे दिवाळी सण 5 ऐवजी 6 दिवसांचा होणार आहे. यंदा 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीपासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे.

दिवाळी सण आणि तारखा

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी म्हणजेच धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल. 11 नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री होणार आहे. दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबरला सकाळी नरक चतुर्दशी साजरी केली जाईल. वास्तविक, चतुर्दशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:58 वाजता सुरू होईल. त्यामुळे 12 नोव्हेंबरला सकाळी रूप चतुर्दशीला स्नान होणार आहे.

त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:45 वाजता अमावस्या तिथी सुरू होईल. दिवाळीच्या दिवशी रात्री महालक्ष्मी पूजन केले जात असल्याने दिवाळी 12 नोव्हेंबरच्या रात्रीच साजरी केली जाईल. 13 नोव्हेंबरला सोमवती अमावस्या होणार आहे. यानंतर 14 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला गोवर्धन पूजा आणि अन्नकूट उत्सव साजरा केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी भाई दूज साजरी केली जाईल. अशाप्रकारे 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेला दिव्यांचा उत्सव 15 नोव्हेंबरपर्यंत साजरा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी आणि छोटी दिवाळी एकाच दिवशी साजरी होणार आहे

तारखांच्या या गोंधळामुळे, यापुढे रविवारी, 12 नोव्हेंबर 2023 रोजी छोटी आणि मोठी दिवाळी एकाच दिवशी साजरी केली जाईल. तसेच 12 नोव्हेंबर रोजी सकाळी नरक चतुर्दशी किंवा रूप चतुर्दशीला स्नान केले जाईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने नरक यातनांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. या दिवशी उटणे वगैरे लावून स्नान केल्याने सौंदर्य वाढते, म्हणून याला रूप चौदस असेही म्हणतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.