Diwali 2024 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे करा फक्त हा एक सोपा उपाय, घरात कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिपोत्सव आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सण. दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Diwali 2024 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे करा फक्त हा एक सोपा उपाय, घरात कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
| Edited By: | Updated on: Oct 08, 2025 | 6:02 PM

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिपोत्सव आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सण.आज 31ऑक्टोबर सर्वत्र दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी एक नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.दिवाळीच्या दिवशी अनेक जण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. अनेक जण घराची साफ सफाई करतात. काही जण या सणाच्या दिवशी घरी पुजेचं आयोजन करतात.मात्र असाही एक उपाय आहे, जो उपाय घरातील महिला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी करतात. अशी मान्यता आहे की, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा जर उपाय केला तर वर्षभर त्या कुटुंबावर लक्ष्मी माता प्रसन्न राहाते.

जर तुम्हालाही वाटतं वर्षभर लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हा सोपा उपाय आवश्य करावा. ज्यामुळे लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहीलं. तुमच्या घरात समृद्धी येईल. आज आपण त्या उपयाबाबत माहिती घेणार आहोत.दिवळीच्या दुसऱ्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका सुपाची आवश्यकता असेल. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून सूप वाजवलं जातं.दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सूप वाजवून गरिबीला दूर करण्याची ही जुनी पंरपरा आहे. हात किंवा दुसऱ्या एखाद्या वस्तुने सूप वाजवलं जातं, सूप वाजवताना लक्ष्मी माता प्रसन्न हो, दरिद्रता निघून जा असं म्हणण्याची प्रथा आहे.

सूप कसं वाजवलं जातं?

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून घरातील महिला हातात तुटलेलं सूप घेऊन घरभर फिरून वाजवतात. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात नेऊन सूप वाजवलं जातं.यावेळी लक्ष्मी येईल, दारिद्र पळून जाईल असं म्हटलं जातं.असं यासाठी म्हटलं जातं की घरातील नकारत्मकता निघून जावी आणि सकारात्मकता यावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)