Astro tips for job | मेहनत करुनही नोकरीत आणि व्यवसायात यश मिळत नाहीये, ज्योतिषशास्त्रातील हे उपाय ट्राय करा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 17, 2021 | 6:02 AM

जीवनाशी निगडीत सर्व सुखे मिळविण्यासाठी प्रत्येक मनुष्य अहोरात्र कष्ट करतो. परंतु, नोकरीत अनेक वेळा कष्ट करुनही मनुष्याला व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि नोकरीत बढती मिळत नाही. तुम्हीही तुमच्या नोकरीत प्रमोशन किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत असाल, तर तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्राचे सोपे आणि प्रभावी उपाय नक्की ट्राय करु शकता.

Astro tips for job | मेहनत करुनही नोकरीत आणि व्यवसायात यश मिळत नाहीये, ज्योतिषशास्त्रातील हे उपाय ट्राय करा
astro-tips-for-job
Follow us

मुंबई : जीवनाशी निगडीत सर्व सुखे मिळविण्यासाठी प्रत्येक मनुष्य अहोरात्र कष्ट करतो. परंतु, नोकरीत अनेक वेळा कष्ट करुनही मनुष्याला व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि नोकरीत बढती मिळत नाही. तुम्हीही तुमच्या नोकरीत प्रमोशन किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत असाल, तर तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्राचे सोपे आणि प्रभावी उपाय नक्की ट्राय करु शकता.

सूर्याच्या उपासनेने सर्व स्वप्न पूर्ण होतील

जर तुम्हाला तुमच्या नोकरीत अपेक्षित प्रगती हवी असेल, तर सर्वप्रथम तुम्ही रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. त्यानंतर स्नान करुन रोज उगवत्या सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून अर्घ्य अर्पण करावे. यासोबत आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्याष्टकांचे पठण करावे.भगवान सूर्याचा हा उपाय केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद मिळेल. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही शत्रूंवर मात करु शकाल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सूर्याच्या उपासनेमध्ये गायत्री मंत्राचाही जप करु शकता.

शंकराच्या पूजेने पदोन्नतीची इच्छा पूर्ण होईल

कल्याणकारी देवता मानल्या जाणार्‍या शंकराची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होण्याचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर तुम्ही भगवान शंकराला समर्पित असलेल्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करत “ॐ सोमेश्वराय नमः” या मंत्राचा जप करावा. यासोबत या मंत्राची किमान एक माळ जप करावी. श्रद्धेने हा उपाय केल्यास चमत्कारी लाभ मिळतात.

पिंपळाच्या पूजेचा महाउपाय

शनिदोषामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायात अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शुभकार्यासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करावे.

दक्षिणावर्ती शंखाचे चमत्कारी उपाय

जर, तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल, तर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सोमवारी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करावी. त्यानंतर रोज या शंखाची पूजा करावी. शंखाशी संबंधित हा उपाय तुमच्या व्यवसायात चमत्कारिक लाभ देईल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Best Astro Remedies | ज्योतिषशास्त्रातील काही सोपे आणि प्रभावी उपाय करा, सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल

Vastu shastra | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही आहे? मग हे वास्तु बदल करुनच पाहा

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI