श्रावण सुरू होण्यापूर्वी या चार गोष्टी आवश्य करा; घरावर राहील सदैव महादेवांची कृपा
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. हा महिना श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिक आहे.

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. हा महिना श्रद्धा आणि भक्तीचं प्रतिक आहे. मात्र जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये कितीही भक्ती करा, पूजापाठ करा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही, कारण जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष असतो, तेव्हा तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश मिळत नाही. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी अशा काही गोष्टी आहेत, ज्या करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, जाणून घेऊयात या गोष्टींबद्दल
स्वच्छता – श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घराची विशेष करून तुमच्या देवघराची स्वच्छता आवश्य करा. तुमच्या घरात भिंतीवर कोपऱ्यात जिथे जाळे निर्माण झाले असतील तर ते काढून टाका, घर स्वच्छ ठेवा. जे घर स्वच्छ असतं तिथे लक्ष्मी मातेचा निवास असतो, अशा घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. त्या घरावर देवी -देवतांची कृपा सदैव राहाते. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता आवश्य करा
बंद घड्याळ – जर तुमच्या घरामध्ये भिंतीवर किंवा कुठेही बंद घड्याळ असेल तर ते त्याच अवस्थेमध्ये ठेवू नका, कारण बंद घड्याळ हे व्यक्तीच्या वाईट अवस्थेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जोचा प्रवेश होतो. अशा वातावरणात पुजा, प्रार्थना यांचा विशेष उपयोग होत नाही.
जीर्ण पोथी – जर तुमच्या देव घरामध्ये फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या पोथ्या असतील, त्या देखील ठेवू नका, कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या पोथ्या किंवा धार्मिक ग्रंथ ठेवता ते नेहमी चांगल्या स्थितीमध्येच असावेत, अशी मान्यता आहे.
खंडीत किंवा तुटलेली मूर्ती – जर तुमच्या देवघरात किंवा घरामध्ये कुठेही तुटलेली तडा गेलेली अशी एखादी मूर्ती असेल तर ती घरात ठेवू नका, कारण अशा मूर्ती समोर केलेली प्रार्थना फलदायी ठरत नाही, जी मूर्ती अखंड आहे, अशाच मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा करावी अशी मान्यता आहे, यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहातं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
