Lord Vishnu Puja Tips | श्री नारायणाची कृपा हवी असेल तर गुरुवारी हे महाउपाय करा, आयुष्यात सुख-समृद्धी लाभेल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 12:05 PM

तुम्ही कोणत्याही वेळी भगवान विष्णूची पूजा करु शकता. परंतु, जर तुम्हाला भगवान नारायणांना लवकर प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यावर ते लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना सुख, संपत्ती आणि सौभाग्याचे वरदान देतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे विशेष फलदायी ठरते.

Lord Vishnu Puja Tips | श्री नारायणाची कृपा हवी असेल तर गुरुवारी हे महाउपाय करा, आयुष्यात सुख-समृद्धी लाभेल
Lord Vishnu

Follow us on

मुंबई : तुम्ही कोणत्याही वेळी भगवान विष्णूची पूजा करु शकता. परंतु, जर तुम्हाला भगवान नारायणांना लवकर प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यावर ते लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना सुख, संपत्ती आणि सौभाग्याचे वरदान देतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे विशेष फलदायी ठरते.

भगवान विष्णूच्या उपासनेची पद्धत आणि त्याच्याशी संबंधित महाउपाय जाणून घेऊया –

💠 गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठावे आणि पाण्यात चिमूटभर हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावे आणि या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालावे.

🔶 आंघोळ आणि ध्यान केल्यानंतर सर्वप्रथम उगवत्या सूर्य नारायणला पाण्यात हळद मिसळून अर्घ्य द्या. या उपायाने तुमच्या कारकिर्दीत येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि प्रगती होईल.

💠 भगवान विष्णूच्या पूजेत पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. अशा स्थितीत भगवान विष्णूला परिधान केलेल्या कपड्यांमध्ये जास्तीत जास्त पिवळा रंग वापरा. त्यांच्या श्रृंगारासाठी फक्त पिवळी फुले वापरा.

🔶 भगवान विष्णूची पूजा करताना त्यांना हळदीचा टिळा लावा आणि प्रसाद म्हणून कपाळावर हळदीचा टिळा लावा. गुरुवारी शुभ हळदीच्या या उपायाने तुमचे सौभाग्य वाढेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

💠 भगवान विष्णूला अर्पण केलेल्या नैवेद्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करावी आणि त्यात तुळशी ठेवावी.

🔶 गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि त्याखाली शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि तेथे काही वेळ भगवान विष्णूचा मंत्र ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ किंवा ‘ॐ नमो नारायण’ किंवा ‘श्रीमन नारायण नारायण हरि-हरि’ या मंत्रांचा जप करा. यापैकी कोणत्याही मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. कुटुंबात नेहमी सुख आणि शांती असते. केळीच्या झाडाची पूजा करण्याबरोबरच पिंपळा झाडाला ही पाणी अर्पण करा.

💠 भगवान विष्णूच्या पूजे नारायण कवच, विष्णू सहस्रनाम आणि गजेंद्र मोक्ष या तिघांचेही पठण करता येते. जर तुम्हाला संस्कृत मंत्र वाचण्यात अडचण येत असेल तर तुम्ही ते पंडिताद्वारे वाचू शकता किंवा तुम्ही त्यांचे हिंदी अनुवाद देखील वाचू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही भगवान विष्णूचा महिमा गीत असलेल्या या मंत्रांचे ऑडिओ देखील ऐकू शकता.

🔶 गुरुवारी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करावी. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गुरुवारी तिला हळदीच्या पाच गाठी अर्पण करा. यानंतर, दुसऱ्या दिवशी, लाल कपड्यात त्या गाठी गुंडाळा आणि आपल्या घरात जिथे संपत्ती ठेवतो त्या ठिकाणी ठेवा. या उपायाने संपत्तीमध्ये वाढ होईल आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या सोबत राहील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Putrada Ekadashi 2021 | पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, अन्यथा आयुष्यात अनेक समस्या उद्भवतील

Putrada Ekadashi 2021 | आज पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI