AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro remedy for Sun | सकाळी या छोट्याशा उपायाने सौभाग्य उजळेल, सूर्य देवाची कृपा होईल

सनातन परंपरेत सूर्याला सौभाग्य आणि आरोग्याची देवता मानले जाते. ज्याचे दर्शन आपल्याला रोज प्रत्यक्ष रुपात होते. ज्यांच्याशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, त्यांची पूजा प्राचीन काळापासून केली आहे. सर्व जगात सूर्याला ऊर्जेचे केंद्र मानले जाते. सूर्याचे हे महत्त्व लक्षात घेता, तो नवग्रहांचा राजा मानला जातो.

Astro remedy for Sun | सकाळी या छोट्याशा उपायाने सौभाग्य उजळेल, सूर्य देवाची कृपा होईल
surya-arghya
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 1:24 PM
Share

मुंबई : सनातन परंपरेत सूर्याला सौभाग्य आणि आरोग्याची देवता मानले जाते. ज्याचे दर्शन आपल्याला रोज प्रत्यक्ष रुपात होते. ज्यांच्याशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, त्यांची पूजा प्राचीन काळापासून केली आहे. सर्व जगात सूर्याला ऊर्जेचे केंद्र मानले जाते. सूर्याचे हे महत्त्व लक्षात घेता, तो नवग्रहांचा राजा मानला जातो.

असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर सूर्याची कृपा झाली तर ती राजाप्रमाणे सर्व सुख उपभोगते. जी व्यक्ती दररोज सूर्याची साधना करते त्याला सौभाग्य, आदर, आत्मविश्वास आणि सरकारी नोकरी इत्यादी मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमकुवत आहे त्यांना जीवनात अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. खूप मेहनत करुनही त्या व्यक्तीला मोठे पद आणि प्रतिष्ठा मिळत नाही. जेव्हा कुंडलीत सूर्य कमकुवत असतो, तेव्हा त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. सूर्य देवाकडून सौभाग्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया.

या मंत्राने सर्व इच्छा पूर्ण होतील

सूर्यदेवाच्या पूजेत मंत्रांना खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला सूर्यदेवांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही सूर्यदेवाच्या या मंत्रांचा दररोज पूर्ण भक्ती आणि विश्वासाने जप करावा. सूर्याच्या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः. ॐ आदित्याय नमः. ॐ घृणि सूर्याय नमः. ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ.. ॐ आरोग्य प्रदायकाय सूर्याय नमः.

या उपायाने सूर्याची कृपा होते

सूर्य देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, नेहमी सूर्योदयापूर्वी उठून आणि आंघोळीनंतर रोज उगवत्या सूर्याला तांब्याच्या कलशाने अर्घ्य अर्पण करावे आणि शक्य असल्यास रविवारी उपवास करावा. या दिवशी शक्य असल्यास मिठाचे सेवन थोडे कमी करा. पण, हा नियम आजारी व्यक्तींना लागू होत नाही.

या उपायानेही इच्छा पूर्ण होतील

जर तुम्हाला सूर्याची शुभता प्राप्त करायची असेल तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या हातात तांब्याचा कडा घालावा. पुरुषांनी तो उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात घालावा. तसेच, आपल्या वडिलांचा आदर करा आणि त्यांना प्रत्येक प्रकारे नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Peepal Worship Remedies : पिंपळाच्या पूजेने शनिदेव होतात प्रसन्न, जाणून घ्या याच्याशी संबंधित खात्रीशीर उपाय

Lord Hanuman worship rules : जाणून घ्या हनुमानाच्या फोटोशी आणि उपासनेशी संबंधित आहेत अनेक महत्वाचे नियम

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.