हा उपाय आहे खूपच प्रभावी, शनि अमावस्येच्या दिवशी करा हे काम, साडेसातीमधून सुटका झालीच म्हणून समजा
दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि देवांची जयंती असते. शनि जयंतीला शनि अमावस्या देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनि देवांचा जन्म झाला होता.

दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि देवांची जयंती असते. शनि जयंतीला शनि अमावस्या देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनि देवांचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला शनि देवांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी भाविक मोठ्या भक्ती भावानं शनि देवांची पूजा करतात तसेच व्रत देखील करतात.
हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी शनि मंदिरात जाऊन पूजा केल्यास शनि देवाची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर राहाते. या वर्षी शनि जयंती 27 मे 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात शनि जयंतीच्या दिवशी करण्याचे विशेष उपाय ज्यामुळे शनि देवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील, कोणतंही संकट तुमच्यावर येणार नाही. जर तुम्हाला शनिची साडेसाती चालू असेल तर त्यातून देखील सुटकारा मिळू शकतो.
शनि जयंतीच्या दिवशी काय करावं?
शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन सूर्य पूत्र शनि देवांना तेल आणि काळे तीळ अर्पण केले पाहिजेत. जर तुम्ही शनि देवांना तेल आणि काळे तीळ अर्पण केले तर शनि देवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहातो, तुमची साडेसातीतून मुक्तता होते असं मानलं जातं.
शनि जयंतीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं. तसेच पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुम्ही शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला, पिंपळाला जल अर्पण केलं तर तुमची साडेसातूनमधून मुक्तता होते, असं मानलं जातं.
जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिच्या साडेसातीचा दोष असेल तर तुम्ही शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरामध्ये होम, हवन करू शकता. शनि जयंतीच्या दिवशी यज्ञ केल्यास शनि देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. या दिवशी शनि मंदिरात जाऊन शनि देवांचा भक्ती भावानं दर्शन करावं असंही म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)