तुमच्याही घरात तुळस आहे? मग हे दोन नियम पाळाच, अन्यथा येईल पश्चतापाची वेळ
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं, ज्या घरात तुळशीचं झाड आहे, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते अशी मान्यता आहे. तुळस ही आस्था, भक्ती, आणि अध्यात्माचं प्रतीक आहे.

हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं, ज्या घरात तुळशीचं झाड आहे, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते अशी मान्यता आहे. तुळस ही आस्था, भक्ती, आणि अध्यात्माचं प्रतीक आहे. तुळशीचं केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात, त्यामुळे आयुर्वेदामध्ये देखील तुळशीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. हिंदू कुटुंबामध्ये जवळपास सर्वांच्याच घरात तुळस असते, तुळशीचं झाडं हे बाल्कनी, घराचं टेरेस किंवा घराच्या छतावर लावलं जातं. मात्र इथे एक गोष्ट आवश्य लक्षात ठेवावी की, केवळ तुळशीचं झाड लावल्यानं तुमचं काम संपत नाही तर त्यासाठी काही खास नियम आहेत, त्यांचं देखील पालन करावं लागतं. धर्मशास्त्रात सांगितलेल्या या नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर तुमच्यावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा राहाते, तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
शास्त्र काय सांगतं?
जर तुमच्या घरात तुळस असेल तर तुळशीला दररोज सकाळी जल अर्पण करणं शुभ मानलं जातं. सकाळी स्नान करून तुळशीला जल अर्पण करावं, तुळशीची पूजा करावी, तुळशीला प्रदक्षिणा मारावी. जर तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण केलं तर तुळशीचं झाड डेरेदार राहातं. घरात शुद्ध ऑक्सिजन येतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात सदैव शांती राहाते, सुख समृद्धी येते.
मात्र शास्त्रानुसार रविवार आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श करू नका, रविवार हा भगवान सूर्य यांना समर्पित आहे, तर एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श करणं, पानं तोडणं, जल अर्पण करणं हा तुळशीचा अपमान समजला जातो, यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूची अवकृपा होऊ शकते.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुळशीच्या जवळ चुकूनही शिवलिंग ठेवू नये, असं करणं शास्त्रात निशिद्ध मानण्यात आलं आहे, असं केल्यास तुमच्या घरात वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
