तुम्हालाही स्वप्नात दिसतात का या गोष्टी, जाणून घ्या शुभ की अशुभ

स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्न पाहणे शुभ मानली जातात तर काहींना अशुभ मानले जाते. स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल सांगतात. जाणून घेऊ अशा स्वप्नांबद्दल जे एखाद्या व्यक्तीला चांगली वेळ सुरू होण्यापूर्वी येतात.

तुम्हालाही स्वप्नात दिसतात का या गोष्टी, जाणून घ्या शुभ की अशुभ
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 8:24 PM

हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या शास्त्रांचा उल्लेख आहे. यापैकीच एक म्हणजे स्वप्न विज्ञान जर तुम्हाला देखील स्वप्न विज्ञानाबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही स्वप्नांचा अर्थ सांगू शकता. स्वप्न विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याला नक्कीच काहीतरी स्वप्न पडत असते. सहसा एखाद्या व्यक्ती असे स्वप्न पाहते जे त्याच्या दैनंदिन कामाशी संबंधित असतात परंतु अनेक वेळा एखादी व्यक्ती अशी स्वप्न देखील पाहते जे भविष्यात चांगले, वाईट, फायदे, वेळ आणि इतर गोष्टी दर्शवते. स्वप्नशास्त्रामध्ये अनेक स्वप्न आणि त्यांचा अर्थ सांगितलेला आहे. जाणून घेऊया काही स्वप्नांबद्दल आणि त्यांच्या अर्थाबद्दल.

पाऊस पडताना दिसणे

तुमच्या स्वप्नात जर तुम्हाला पाऊस पडताना दिसला तर स्वप्नशास्त्रानुसार हे शुभ मानले जाते. स्वप्नात पाऊस पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे. त्यासोबतच पाऊस पाहणे म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे.

चंद्र दिसणे

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये चंद्र दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात चंद्र दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबात काही समस्या सुरू असतील तर त्या आता दूर होणार आहे. यासोबतच तुमचे घर आनंदाने भरणार असल्याचा संकेत आहे.

नख कापताना दिसणे

जर तुम्ही स्वप्नात स्वतःला नखे कापताना दिसला तर हे शुभ लक्षण आहे. स्वप्नात स्वतःचे नखे कापताना दिसणे त्याचा अर्थ असा होतो की आपल्यावर जे काही कर्ज आहे त्यातून आपण मुक्त होणार आहोत. त्यासोबतच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे.

उडताना पाहणे

स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःला पक्षाप्रमाणे उडताना पाहत असाल तर स्वप्नशास्त्रानुसार तुमचा चांगला काळ आता जवळ आला आहे. एवढेच नाही तर स्वप्नात स्वतःला पक्षासारखे उडताना पाहणे म्हणजे तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्या आता संपणार आहेत.

नदी दिसणे

स्वप्नामध्ये जर तुम्हाला नदी दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळणार आहे किंवा तुमचे एखादे चांगले काम होणार आहे.

बाग दिसणे

तुम्हाला जर तुमच्या स्वप्नामध्ये बाग दिसली तर ते शुभ आहे. स्वप्नात बाग पहाणे म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. एवढेच नाही तर काहीतरी फायदा देखील होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.