मंदिरात फुलांवर किंवा प्रसादावर पाय पडला तर पुण्य नष्ट होते का? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
मंदिरात किंवा धार्मिक स्थळी चुकून फुलांवर किंवा प्रसादावर पाय पडल्यास पुण्य नष्ट होते का? यावर प्रेमानंद महाराजांनी याबद्दलच सत्य काय आहे ते सांगितलं आहे. तसेच प्रसाद किंवा फुले पायाखाली आली तर त्यावेळी काय करावं हे देखील महाराजांनी सांगितलं आहे.

प्रत्येकजण आपल्या देवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध नियमांनुसार पूजा करत असतो. काहीजण दररोज मंदिरात जातात. कारण त्यांना तिथे गेल्यवर शांतता आणि सकारात्मकता मिळते. त्यांना मंदिरात देवाची पूजा करण्यासाठी भक्तीचं वातावरण मिळतं. तसेच अनेकजण भजन, कीर्तनासाठीही मंदिरात जातात. देवाचे दर्शन आणि पूजा केल्याने व्यक्तीचे दोष हळूहळू कमी होऊ लागतात.
फूले, माळ किंवा प्रसादावर पाय पडला तर पाप लागते किंवा पुण्य नष्ट होते का?
आजकालच्या तीर्थक्षेत्राला जाणाऱ्यांची देखील तेवढीच गर्दी दिसते. मॉर्डन जगण्यासोबतच अध्यात्मिक प्रवासही वाढताना दिसत आहे. पण कधी कधी आपण पाहतो की धार्मिक स्थळी, मंदिरांमध्ये तुळशी फूले, बेलाची पाने किंवा जमिनीवर प्रसाद सांडलेला असतो. पण त्या गर्दीत लक्षात येत नाही त्यामुळे त्यावर पाय पडतो. मग अनेकांना असा प्रश्न असतो की जर मंदिरात किंवा अशा तीर्थस्थळी पायाखाली फूले, माळ किंवा प्रसादावर पाय पडला तर पाप लागते किंवा पुण्य नष्ट होते का? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत असतात. याच प्रश्नाचं प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिलं आहे. तसेच या शंकांचं निरसनही केलं आहे.
प्रेमानंद महाराजांना त्यांच्या प्रवचना दरम्यान एका संभाषणात, एका व्यक्तीने त्यांना हा प्रश्न विचारला होता.त्याच उत्तर महाराजांनी काय दिलं आहे ते जाणून घेऊयात.
एका व्यक्तीने महाराजांना विचारलेला प्रश्न
प्रेमानंद महाराजांशी एका खाजगी संभाषणात त्या व्यक्तीने महाराजांना सांगितले की, जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा अनेक वेळा तुळशीची पाने, फुले, माळा इत्यादी आपल्या पायाखाली नकळत येतात. ज्यामुळे आपण केलेले सर्व चांगले कर्म नष्ट होतात. अशा परिस्थितीत माझे मन पूर्णपणे अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा तो व्यक्ती मंदिरात जातो तेव्हा तो त्याचे पाय खूप काळजीपूर्वक ठेवतो जेणेकरून त्याच्या पायाखाली प्रसाद किंवा देवाची फूले येणार नाहीत. त्याच्या या प्रश्नावर महाराजांनी उत्तर दिले.
या प्रश्नाचे उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, जर तुमचे पाय नकळत फुले, माळा, तुळशी इत्यादींवर पडले तर तुम्ही ते उचलून कपाळाला लावून पाया पडा. ते तुमच्या खिशात ठेवा. नंतर ते कोणत्याही झाडाखाली, किंवा कोणत्याही साफ पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करावे.
प्रसाद पायाखाली पडला तर काय करावे?
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की देवाला अर्पण केलेले फूल तुमच्या पायाखाली पडले तर ते पाप आहे. जर ते तुमच्या पायाखाली पडले तर ते उचला, कपाळावर स्पर्श करा आणि “राधे-राधे” असं नामस्मरण करा, ते तुमच्याकडे ठेवा आणि नंतर ते वाहून टाका.
प्रसाद घेण्याचे नियम
आजकाल लोक देवाला फुले, हार, तुळस इत्यादी अर्पण करताना लक्ष देत नाहीत. पुजाऱ्याकडून प्रसाद घेताना तो बहुतेकदा वाटेत सांडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रसाद नेहमी स्वच्छ रुमालात, किंवा कागदात ठेवला पाहिजे. महिलांनी तो पदरात घेतला तरी चालेल. जेणेकरून तो सांडणार नाही.
जर तुम्ही तुमच्या पायाखाली पडलेली फुले उचलू शकत नसाल तेव्हा
कधीकधी धार्मिक स्थळे इतकी गर्दीची असतात की तुम्हाला नमन करण्यासाठीही जागा नसते. जर तुमच्या पायाखाली एखादे फूल पडले किंवा तुमच्याकडून ते चुकून खाली पडले असेल आणि ते तुम्ही उचलू शकतस नसाल तर लांबून पाया पडा आणि क्षमा मागा. असे केल्याने पाप लागणार नाही.
