AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळवारी हे काम बिलकूल करू नका, अडचणी वाढल्याच म्हणून समजा..

एखादं काम कधी करावं, कधी करू नये, याबद्दल हिंदू धर्मात विस्तृतपणे लिहीलेलं आहे. केस कापणं, नख कापणं याबद्दलही काही नियम सांगितलं आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ मानले जाते आणि कोणत्या दिवशी नखे कापू नयेत याचे काही नियम आहेत.

मंगळवारी हे काम बिलकूल करू नका, अडचणी वाढल्याच म्हणून समजा..
मंगळवारी हे काम करणं टाळा..Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 27, 2025 | 2:36 PM
Share

हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीशी संबंधित काही विशेष नियम आहेत. अगदी आपल्या हाता-पायाची नखं कापण्याचेही काही खास नियम आहेत. वडीलधारी लोक अनेकदा रात्री किंवा एखाद्या विशेष दिवशी नखं कापण्यास मनाई करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री कधीही नखे कापू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि जीवनात संकटे सुरू होतात, असे मानले जाते. कोणत्या दिवशी नखे कापू नयेत आणि कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया.

या दिवशी चुकूनही नखं कापू नका

मंगळवार : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारी नखे कापणे निषिद्ध आहे. मंगळवारी नखे कापल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडते असे मानले जाते. विशेषतः हनुमानाचे व्रत करणाऱ्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे.

गुरुवार : गुरुवारी नखं कापणं देखील निषिद्ध मानलं जातं. गुरुवारी नखे कापल्याने वैवाहिक संबंधांमध्ये कलह निर्माण होतो आणि पती-पत्नीमधील अंतर वाढते असे मानले जाते.

शनिवार : शनिवारीदेखील नखं कापू नयेत. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत आहे, त्यांना शनिवारी नखे कापल्याने मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागेल. यामुळे आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

रविवार : तसेच, रविवारी नखे कापल्याने प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि यशातही अडथळा येतो. रविवारी नखे कापल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणून, या दिवशी नखे कापू नयेत.

या दिवशी कापू शकता नखं

सोमवार : ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारी नखं कापणं शुभ मानलं जातं. या दिवशी नखं कापल्याने अज्ञानाच्या पापापासून मुक्तता मिळते असे मानले जाते. सोमवार हा भगवान शिव, चंद्र आणि मनाशी संबंधित आहे.

बुधवार : याशिवाय बुधवार हा दिवस देखील नखं कापण्यासाठी शुभ मानला जातो. बुधवारी नखं कापल्याने आर्थिक लाभ होतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते. यामुळे व्यवसायातील उत्पन्नही वाढते.

शुक्रवार : शुक्रवार हा नखं ​​कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात धन, समृद्धी आणि सौंदर्य वाढते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...