AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Tritiya 2022 : द्रौपदी आणि अक्षय तृतीया ! या दिवशी युधिष्ठिराला एक वरदान मिळालं, वनवासात असताना हे वरदान द्रौपदीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं

अख्यायिकांमधून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं कळून येतं आणि म्हणून हा दिवस हिंदू धर्मात सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. काय आहेत या आख्यायिका, महाभारत,द्रौपदी,अन्नपूर्णा, श्रीकृष्ण-सुदामा, पवित्र गंगा नदी, सतयुग, त्रेतायुग या सगळ्याचा आणि अक्षय तृतीयेचा काय संबंध ? जाणून घेऊयात...

Akshay Tritiya 2022 : द्रौपदी आणि अक्षय तृतीया ! या दिवशी युधिष्ठिराला एक वरदान मिळालं, वनवासात असताना हे वरदान द्रौपदीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं
द्रौपदी आणि अक्षय तृतीया ! Image Credit source: facebook
| Updated on: Apr 28, 2022 | 4:36 PM
Share

हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) प्रचंड महत्त्व आहे. चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीयेसारखा मुहूर्त लोकं चुकूनही चुकवत नाहीत. अक्षय तृतीया साजरी (Celebrate) करण्यामागे अनेक आख्यायिका आहेत, अनेक कथा (Stories) आहेत. आख्यायिका जरी प्रदेशांनुसार, लोकांनुसार वेगवेगळ्या असल्या तरी त्या सगळ्या आख्यायिकांमधून येणारे निष्कर्ष मात्र सारखेच आहेत. या आख्यायिका आपल्याला दान सर्वश्रेष्ठ आहे हे सांगतात, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा मुहूर्त नाही हे सांगतात. आख्यायिकांमधून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं कळून येतं आणि म्हणून हा दिवस हिंदू धर्मात सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. काय आहेत या आख्यायिका, महाभारत,द्रौपदी,अन्नपूर्णा, श्रीकृष्ण-सुदामा, पवित्र गंगा नदी, सतयुग, त्रेतायुग या सगळ्याचा आणि अक्षय तृतीयेचा काय संबंध ? जाणून घेऊयात…

आख्यायिका

1. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.

2. अक्षय तृतीयेच्याच दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती.

3. देवी अन्नपूर्णेला देवी पार्वतीचे रूप मानले जाते, देवी अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी झाला होता. या दिवशी लोकं अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान देतात.

4. दक्षिण भारतातील मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाचं देवता बनवलं होतं. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते.

5. महाभारतामध्ये देखील अक्षय तृतीयेचा उल्लेख सापडतो. महर्षी वेद व्यास यांनी याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘अक्षय पात्र’ वरदान म्हणून मिळाले. वनवासात असताना या पात्रात द्रौपदी भोजन करायची, द्रौपदीचं भोजन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अक्षय पात्रातील अन्न संपत नसे.

6. एका कथेनुसार असे ही म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या याच शुभ दिवशी भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती.

7. भविष्यपुराण नुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगचा आरंभ झाला होता.

इतर बातम्या :

Planet Parade: 1000 वर्षांनंतर या आठवड्यात शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी असतील एका सरळ रेषेत, वाचा सविस्तर

Sikh Dharma : काय विषय ए ? शीख बांधव हातात ‘कडं’ का घालतात ? सोन्याचं कडं पण चालत नाही म्हणे, नियम आहे अध्यात्माचा

Guruwar Special Upay : गुरुवारी करा हे उपाय, वैवाहिक जीवनातील समस्या, आर्थिक संकटातून मुक्ती मिळवा

आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.