Sikh Dharma : काय विषय ए ? शीख बांधव हातात ‘कडं’ का घालतात ? सोन्याचं कडं पण चालत नाही म्हणे, नियम आहे अध्यात्माचा

शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला 'वाहे गुरू' म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे.

Sikh Dharma : काय विषय ए ? शीख बांधव हातात 'कडं' का घालतात ? सोन्याचं कडं पण चालत नाही म्हणे, नियम आहे अध्यात्माचा
शीख बांधव हातात 'कडं' का घालतात ? Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:29 PM

शीख धर्माची स्थापना गुरू नानक (Guru Nanak) यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये (Punjab) केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख (Sikh) वास्तव्य करतात. शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला ‘वाहे गुरू’ म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले.

दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली. गुरू गोविंदसिंग यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. या पंथाचे स्वरूप लढाऊ होते कारण अर्थातच त्यावेळचे राजकीय वातावरण. त्यावेळी समाजबांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी पाच ककारांची निर्मिती त्यांनी केली. या पाच ककारमध्ये ‘कडे’ एक आहे म्हणून शीख बांधव कडा घालतात.

‘5’ ककार

1. केस (हे केस कधीच कापायचे नाहीत.)

2.कडे (स्टीलचे)

3.कंगवा (लाकडापासून बनलेला)

4.कच्छा (सूती विजार)

5.कृपाण (एक प्रकारचा चाकू)

कडे हा दागिना म्हणून वापरत नसल्यामुळे ते सोन्याचांदीऐवजी स्टीलचे असावे. या कड्यामुळे गुरूशी एकनिष्ठ राहता येते. कोणतेही धर्मविरोधी काम करणार नाही याची सतत आठवण राहण्याचे काम कडे करते. शीख लोकांच्या हातातील ‘कडे ‘ हे विनयाचे व संयमाचे प्रतिक आहे . देवाला सुरूवात नाही व शेवटही नाही याचे कडे हे प्रतीक मानले जाते. याशिवाय एक शीख उजव्याच हातात फक्त एकच कडे घालू शकतो असाही नियम आहे. कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी हे कडे एक विशिष्ट ऊर्जा देते व कडे घातलेला व्यक्तीला कोणतेही भय नसते असे शीख धर्मात मानले जाते.

शीख धर्माची शिकवण

देवाला हदयात ठेवा

प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा

सर्वांशी समान वागा

दुसरयांची सेवा करा

दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका.

इतर बातम्या :

Guruwar Special Upay : गुरुवारी करा हे उपाय, वैवाहिक जीवनातील समस्या, आर्थिक संकटातून मुक्ती मिळवा

Chanakya Niti : ‘या’ चार गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या काय सांगतात आचार्य चाणक्य

Horoscope Today 28 April 2022 : चार राशींच्या लोकांची कामे होतील पुर्ण, नोकरीत बढतीची शक्यता, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.